
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही कपात झाली आहे. सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई पालिकेकडून ठाण्याला ८५ दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. परंतू पाणी पुरवठा करणाऱ्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. परंतू ठाणे पालिकेच्या पम्पिंग स्टेशनवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता केवळ काही भागांनाच नाही तर संपू्र्ण शहरालाच या बिघाडामुळे कपातीचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, यासाठी विभागावर म्हणजे सकाळी ९.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसनिहाय या भागात पाणी पुरवठा बंद:-
३ डिसेंबर - माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली.
४ डिसेंबर - गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क.
५ डिसेंबर - सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर.
६ डिसेंबर - दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर.
७ डिसेंबर - राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर,
८ डिसेंबर - लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.