Maratha Andolan Mumbai Saam Tv
व्हायरल न्यूज

Manoj Jarange Protest: मोबाईलची चार्जिंग संपलं; कुटुंबीयांना फोन करता येईना, मराठा आंदोलकाने केला जुगाड; VIDEO चर्चेत

Maratha Andolan Mumbai: मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होत आहे. अशामध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आंदोलकाने चार्जिंगचा जुगाड केल्याचे दिसत आहे.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस.

  • आंदोलक सीएसएमटी स्थानकावर झोपून आंदोलन करत आहेत.

  • मोबाईल चार्जिंगसाठी आंदोलकाचा जुगाड व्हिडिओ व्हायरल.

  • राज्यभरातून आंदोलकांना जेवण आणि पाणी पोहोचवले जात आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. तर राज्यभरातून आणखी मराठा बांधव येतच आहेत. त्यामुळे आझाद मैदान परिसर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. हे आंदोलनक याच परिसरात कसं तरी राहत दिवस काढत आहेत. त्याच ठिकाणी जेवण आणि झोपत आहेत. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या ठिकाणावरून अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. अशामध्ये एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एका मराठा आंदोलकाने मोबाइलची चार्जिंग संपल्यामुळे जुगाड केल्याचा हा व्हिडीओ असून तो तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलकांची गैरसोय होत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरच झोपून त्यांनी दोन रात्री काढल्या. आज तिसऱ्या दिवशी देखील त्यांचे आंदोलन सुरूच आहे. मोबाईलचे चार्जिंग संपत आले आहे. त्यामुळे कुटुंबियांशी संपर्क करता येत नाही. अशात मराठा आंदोलकांना मोबाईल चार्जिंगसाठी कसरत करावी लागत आहे. एका मराठा आंदोलकाने मोबाईल चार्जिंग करण्यासाठी जुगाड केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोटरमन आणि गार्ड लॉबीच्या बोर्डला लाईटची पॉवर देण्यात आली आहे. त्याच लाईट पॉवर बोर्डमध्ये मोबाईल चार्जिंगला लावताना मराठा आंदोलक दिसत आहे. त्यासाठी तो एका पाईवर चढून मोबाईलला चार्जिंग करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्यभरातले मराठा बांधव एक्सप्रेस, खासगी वाहनं आणि बसच्या माध्यमातून आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तसेच रात्री मुख्यमंत्री विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याच बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी उपसमितीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री, विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यामध्ये तब्बल १ तास चर्चा झाली. आज शरद पवार देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा बांधवांसाठी राज्यभरातून नाश्ता, भाकर, चहा, बिस्किट आणि पाणी पाठवले जात आहे. आझाद मैदानात मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यभरातून त्यांना खाण्यासाठी जेवण पाठवले जात आहे. आठ हजारांपेक्षा जास्त भाकरी आणि चपात्या आझाद मैदानावर दाखल झाल्यात. दोन दिवसांमध्ये मराठा बांधवांची गैरसोय झाली होती. त्यामुळे राज्यभरातला मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संभाजीनगरच्या स्वराजची झेप, CBSE साउथ झोन - II चॅम्पियनशिपमध्ये पराक्रमी विजय

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; ५३७ रिक्त जागा; कधीपर्यंत अर्ज करता येणार? वाचा सविस्तर

Box Office: बॉक्स ऑफिसवर 'परम सुंदरी'ची जादू; 'कुली' आणि 'वॉर 2' ला टाकलं मागे, तिसऱ्या दिवशी कलेक्शन किती?

Manoj jarange patil protest live updates : जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर दाखल

पुरामुळे प्रचंड हाहाकार, ५ लाख लोक बेघर, जनावरं पाण्यात वाहून गेली, आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT