
मनोज जरांगे पाटील अशा मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत ज्या मान्यच होणार नाहीत - चंद्रकांत पाटील
सरसकट मराठा कुणबी नोंद शक्य नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
मुंबईत ट्रॅफिक व सामान्य जनतेला त्रास, आंदोलनामुळे नागरिकांना वेठीस धरू नये असे आवाहन.
विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी
Chandrakant Patil on Manoj Jarange Patil Protest : मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांसह आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. 'ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत. हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरु नका', असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीच्या पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.
'ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत दिली आहे. कुणबी नोंद मराठवाड्यात लवकर सापडत नाही. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे, त्यातून ५८ लाख नोंदी सापडल्या. एक नोंद दहा दाखले देऊ शकते. या देशाचा कायदा आहे. जातीची नोंद वडिलांकडून काढावी लागते', असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सरसकट मराठ्यांना कुणबी करा हे कोणत्याही कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने देखील तसे म्हटले आहे. अशी मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही. प्रॅक्टिकल नियमांनी या. लोकशाहीत काहीही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे. पण मुंबईसारखे शहर विस्कळीत करता येणार नाही. मुंबईतल्या सर्व सामन्यांचा काय दोष? मुंबईत ट्रॅफिक जाम झाले आहे.'
'जरांगे पाटील यांनी आवाहन करुन देखील त्यांचे कोणी ऐकत नाही. तोडगे जे-जे काढत आले, ते काढले, ना इलाजला काही इलाज नाही. जे मान्य होणार आहे, ते मान्य करु. पण जे मान्य नाही होणार त्याचा हट्ट का? एकनाथ शिंदे यांनी कोणतेही कोटो आश्वासन दिले नाही. त्यांनी जे लिहून दिले, ते सर्व पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल मागण्या कराव्यात', असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.