Maharashtra Politics : मोठी बातमी! अजित पवार गट भाजपला धक्का देणार? घडामोडींना वेग

Maharashtra Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भाजपला धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढणार?

  • पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची चर्चा.

  • पदाधिकाऱ्यांना सर्व जागांची तयारी करण्याच्या अजित पवारांच्या सूचना.

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढू, स्वबळावर लढू. काही ठिकाणी मतभेद असतील, पण महायुती हाच पहिला पर्याय राहील असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. महायुतीच्या इतर नेत्यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुका महायुती एकत्र लढवणार असल्याचे सांगितले होते. पण निवडणुकीपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वबळाची चाचणी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पुणे महानगरपालिका अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Maharashtra Politics
Gokul : गोकुळच्या दूध खरेदी दरात लिटरमागे एका रुपयाची वाढ, साडेचार ते पाच कोटींचा फायदा होणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज (३० ऑगस्ट) पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांना अजित पवारांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. सर्व जागांची तयारी करण्याच्या सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. युती होईल की नाही याचा विचार आता करु नका, निवडणुकीपूर्वी शेवटच्या ३ महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

Maharashtra Politics
Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्या-त्या प्रभाग रचनेच्या पद्धतीत लढण्याची तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Politics
Maratha Protest : आझाद मैदानात गळफास घेण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांनी रोखलं अन् अनर्थ टळला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार असे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वबळावर लढण्यासाठी आजपासून तयारी करणार आहोत. महायुतीत लढून नुकसान करुन घेण्यापेक्षा स्वबळावर लढून आमचा महापौर बनवू, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : राज्यात मनसेला खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com