CSMT Central Railway : सीएसएमटी स्थानकावरील दुरुस्तीमुळे ठाणे, कल्याणच्या पुनर्विकासाला विलंब

Central Railway : ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांवरील दुरुस्तीचे काम आरएलडीएने थांबवले आहे. हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवर दुरुस्तीच्या कामाला विलंब झाल्याने घेण्यात आला आहे.
CSMT
CSMTx
Published On
  • ठाणे-कल्याण स्थानकांवरील पुनर्विकासाचे काम थांबवण्याचा निर्णय

  • सीएसएमटी स्थानकाच्या दुरुस्तीला विलंब झाल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय

  • सीएसएमटीच्या ५० टक्के कामानंतर ठाणे-कल्याणच्या कामाला होणार सुरुवात

Central Railway News : रेल्वे भूमि विकास प्राधिकरणाने ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनचे किमान ५० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच ठाणे-कल्याणच्या पुनर्विकासाला सुरुवात होईल असा निर्णय आरएलडीएने घेतला आहे. सीएसएमटी स्थानकाच्या दुरुस्तीचे काम १५ टक्के झाले आहे. या कामासाठी २,४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुनर्विकासाचे काम वेगाने सुरु झाल्यानंतर ब्लॉकची आवश्यकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द किंवा स्थलांतरित केल्या जातील. ठाणे आणि कल्याण येथे समांतर पुनर्विकास सुरु केल्यास मुख्य मार्गावर अतिरिक्त ब्लॉकचा ताण निर्माण होईल. याचा परिणाम उपनगरीय आणि मेल/ एक्सप्रेस या दोन्ही सेवांवर होईल, अशी माहिती आरएलडीएने दिली आहे.

CSMT
Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

जर एकाच वेळी रेल्वेच्या वेळापत्रकात अनेक बदल केले, तर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होईल, असे रेल्वे विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आणि कल्याणमध्ये पुनर्विकासाचे काम सुरु करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासत ५० ते ६० टक्के प्रगती अपेक्षित आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला टर्मिनसवर मोकळीक मिळेल आणि इतर दोन स्थानकांवर काम व्यवस्थापित केले जाईल.

CSMT
सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

आरएलडीए म्हणजेच रेल्वे भूमि विकास प्राधिकरण ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या समन्वयाने ठाण्यात मल्टी-मॉडल ट्रान्झिट हबची योजना आखत आहे. ठाणे स्थानकाच्या पूर्व बाजूस तळघरासह ११ मजली व्यावसायिक इमारत होणार आहे. ही इमारत १.१ लाख चौरस मीटरवर पसरलेली असेल. ठाणे स्टेशनवर मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गांवरून उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. दररोज ६.५ लाखांहून अधिक प्रवासी येथे प्रवास करतात आणि १० प्लॅटफॉर्मवरून १,००० पेक्षा जास्त गाड्या ये-जा करतात. या पुनर्विकासाचे उद्दिष्ट गर्दी कमी करणे, पूर्व-पश्चिम जोडणी सुधारणे, तसेच प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवणे आहे. यासाठी २० लिफ्ट, १७ एस्केलेटर आणि ३ ट्रॅव्हलरेटर बसवले जातील. तसेच व्यावसायिक वापरासाठी फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय)चा पूर्ण वापर केला जाईल.

CSMT
Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com