Manoj Jarange Protest : वर्षावर मध्यरात्री खलबतं, तोडगा निघणार? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट आदेश

Maratha reservation protest in Mumbai : सरकारकडून शिंदे समिती व उपसमितीची बैठक घेऊन चर्चा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसात तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Devendra Fadnavis role in Maratha reservation issue
Maratha reservation protest intensifies in Mumbai as Manoj Jarange Patil continues hunger strike. Varsha bungalow midnight meeting fuels speculation on government’s next move.x
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठे आंदोलन करत आहेत.

  • उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी आरक्षणाशिवाय निघणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

  • वर्षा बंगल्यावर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुप्त बैठक पार पडली.

  • सरकारकडून उपसमितीने लवकर निर्णय घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

Manoj Jarange Patil hunger strike updates : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये मराठ्यांचे वादळ धडकले आहे. अन्न-पाणी, पावसाची तमा न बाळगता लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये मराठ्यांचे आरक्षणाच्या मु्द्यावर आंदोलन सुरूये. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारकडून पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. शिंदे समितीने जरांगेंसोबत चर्चा करत वेळ मागितला. पण मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आक्रमक भूमिका घेत आरक्षण दिल्याशिवाय निघणार नाही. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Azad Maidan Maratha reservation agitation live)

वर्षावर खलबतं, दोन तास चर्चा

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. जवळपास एक ते दोन तास जरांगे पाटील यांच्या उपोषणावर चर्चा झाल्याचे समजतेय. त्यानंतर दोन्ही नेते खासगी गाडीने वर्षाच्या निवस्थानावरून निघाले. गुप्त बैठक असल्याने येताना शासकीय वाहनाचा उपयोग तर जाताना खाजगी वाहनातून वर्षाबाहेर पडले. वर्षावर नेमकं काय खलबतं काय झालं? याबाबत राजकीय चर्चेला वेग आलाय.

Devendra Fadnavis role in Maratha reservation issue
मुंबईचे वातावरण तापलं, BMC समोर मोठा गोंधळ, मराठा आंदोलक अन् पोलिसांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ

शनिवारी मध्यरात्री वर्षावर काय खलबतं झाले?

मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे, मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा तर झालीच परंतु पाटील यांच्या मागण्या बाबत कोणतीतरी भूमिका उपसमितीने ठाम करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या दोन दिवसात यावर निर्णय घ्यावा. उपसमितीने जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्यात.

Devendra Fadnavis role in Maratha reservation issue
राजधानीत मराठा, उपराजधानीत ओबीसी....आरक्षणावरून महाराष्ट्र तापला, फडणवीस सरकार खिंडीत

मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा तिसरा दिवस

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अमरण उपोषण करत आहे. आजचा तिसरा दिवस आहे. राज्यभरातून मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. लोकल, एक्सप्रेस, बसने मराठे आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तसेच रात्री मुख्यमंत्री विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी उपसमितीने निर्णय घ्यावा, अशा प्रकारची भूमिका मांडली आहे.

Devendra Fadnavis role in Maratha reservation issue
मराठ्यांचे मुंबईत वादळ, एकनाथ शिंदे दरेगावात जाणार, राज्यात मोठी घडामोड घडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com