Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा कार्यकर्त्याचा पार्थिव अहमदपूरमध्ये दाखल, परिसरात हळहळ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, मनोज जरांगेंचं आझाद मैदानावर आंदोलन, गणेशोत्सव, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Manoj jarange patil Mumbai Maharashtra Live News UpdateSaam TV Marathi News

मराठा कार्यकर्त्याचा पार्थिव अहमदपूरमध्ये दाखल, परिसरात हळहळ

विजय घोगरे मराठा कार्यकर्त्याचा पार्थिव अहमदपूरमध्ये दाखल, मोठ्या संख्येने मराठा समाज जमा..

AC.. लातूरच्या अहमदपूर वरून मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी गेलेले विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे, दरम्यान या मराठा कार्यकर्त्यांच पार्थिव आज लातूरच्या अहमदपूर येथे दाखल झाल आहे, तर अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंतदर्शनासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते यांनी नागरिक जमा झालेत, विजय घोगरे यांच्या पश्चात दोन लहान मुलं, पत्नी आई-वडील असा परिवार आहे, विजय घोगरे हा घरात एकटाच करता पुरुष होता, तर कुटुंबात केवळ दीड एकर जमीन आणि त्यातही आरक्षण नाही यासाठी सातत्याने तो मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी असायचा...

छत्रपतींच्या सुभेदाराच्या वंशजाने घरी साकारला हुबेहूब लाल महाल

छत्रपतींच्या सुभेदाराच्या वंशजाने घरी साकारला हुबेहूब लाल महाल...घरगुती गणपती समोर साकारलेला देखावा ठरतोय नागरिकांच्या आकर्षणाचा विषय

गणेशोत्सवाला आता सुरुवात झाली, जगभरातून लोक हे पुण्यातील देखावे पाहण्यासाठी येत असतात.पुण्यातील देखावे हा नेहमीच गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय असतो.पुण्यातील मंडळातील देखाव्यांबरोबरच आता घरगुती देखावे देखील आता आकर्षणाचा विषय ठरत आहेत.गणेशोत्सवात आकर्षक देखावे साकारण्याची परंपरा पुढे नेत नारायण पेठेतील संकेत सोपान बलकवडे यांनी त्यांच्या घरातील बाप्पासाठी हुबेहूब लाल महाल उभारला आहे.

ओबीसी समाज बांधवांची कल्याणमध्ये बैठक

ओबीसी समाज बांधवांची कल्याणमध्ये बैठक.

ओबीसी समाज आक्रमक.

जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आक्षेप.

आमचे आरक्षण हिसकावून देणार नाही.

५५ टक्के समाज रस्त्यावर उतरेल.

पुण्यात गणरायासमोर ऑपरेशन सिंदूरचा देखावा

पुण्यातील गणपती प्रसिद्ध असतात ते भव्य देखाव्यासाठी... ज्याप्रकारे सार्वजनिक गणेश मंडळ देखावे करतात तसे घरगुती देखावे ही पुण्यात प्रसिद्ध आहेत.पुण्यातील कर्वेनगर परीसरातील पटवर्धन बाग एरंडवणे या ठिकाणी ऐश्वर्या जाधव या महिलेनं आपल्या गणपती समोर ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या महिला लष्कर अधिकार यांचे फोटो उभारत भरतीय सैन्याच लष्करी सामर्थ्य दाखवणारा देखावा केला आहे. या देख्याव्याची चर्चा शहरभर असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक जात.

Pune: मराठा आंदोलकांसाठी पुण्यातील मुस्लिम बांधवांनी जेवण पाठवले

पुणे -

पुण्यामध्ये आज मराठा आंदोलनासाठी व आंदोलकांच्या भोजन व्यवस्थेसाठी पुण्यातील मुस्लिम बांधव एकत्र येत मुंबईला रवाना झाले .

कोंढव्यातून सकाळी मराठा आंदोलकाच्या सेवेसाठी मुस्लिम समाजाचा पाठिंबा देत, घोषणा देत छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा फाउंडेशन आंदोलकांच्या भोजन व्यवस्थेसाठी आणि आंदोलनसाठी रवाना झाले .

Manoj Jarange: बीड जिल्ह्यातील 50 गावांनी आंदोलकांसाठी पाठवल्या 5 लाख भाकरी, ठेचा चटणी

बीड जिल्ह्यातील 50 गावांनी पाठवल्या 5 लाख भाकरी, ठेचा चटणी शिदोरी

आंदोलकांसाठी जेवण मुंबईच्या दिशेने रवाना.

आझाद मैदानावरील सुरू असलेल्या उपोषण स्थळावरील आंदोलकांसाठी गावखड्यातून शिदोरी.

मुंबईत मराठा समाज बांधवांची जेवणाची होतीय गैरसोय.

आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी बीड जिल्ह्यातील गाव खेड्यातून पाच लाख भाकरीची शिदोरी मुंबईच्या दिशेने

Hingoli: मराठा बांधवांची हिंगोली- अकोला राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत घोषणाबाजी

मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सरकार बंद करत असल्याने आता सरकारच्या विरोधात गावपातळीवर मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत.

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घोळवा पाटी येथे आंदोलकांनी हैदराबाद अकोला राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने मराठ्यांची मुंबईत अडवणूक केल्यास महिला व मुला बाळांना सोबत घेऊन मुंबई गाठणार असल्याचे देखील यावेळी मराठा आंदोलक म्हणाले आहेत.

Dharashiv: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण

धाराशिव -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण

धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी गावात गावकऱ्यांनी केले साखळी उपोषण सुरू

गावातील सर्वच जाती धर्मामातील नागरीकांचा वतीने साखळी उपोषणात सहभाग

सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी

एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करत आजपासून साखळी उपोषण केल सुरू

Nashik: मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलकंसाठी जेवण, पाण्याची रसद

मराठा आंदोलकंसाठी नाशिकच्या दिंडोरी मतदार संघातून मराठा कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळून प्रत्येक घरातून चपाती, चटण्या, भेळ भत्ता तसेच पाण्याच्या बाटल्या घेऊन मराठा कार्यकर्ते मुंबई कडे रवाना झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळेवर जेवण मिळावे यासाठी दिंडोरीतून घराघरातून जेवणाची रसद गाडीत घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहे,

Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेवरून मराठा बांधवांसाठी 15 ते 20 टँकर

नवी मुंबई महानगरपालिकेवरून मराठा बांधवांसाठी 15 ते 20 टँकर

अडीचशे पेक्षा टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली

दीडशेपेक्षा आंघोळ करण्यासाठी नळ उपलब्ध करून

सिडको एक्जीबिशन मधून अजून 100 एक टॉयलेट खुले करण्यात येणार आहेत

Shirdi: साईबाबांच्या शिर्डीतूनही मुंबईतील आंदोलकांसाठी चटणी भाकरीची शिदोरी आणि पाण्याची व्यवस्था

जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मुंबईत आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांसाठी साईबाबांच्या शिर्डीतून चटणी भाकरीची शिदोरी रवाना करण्यात आली आहे.

शिर्डी शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने चटणी भाकरी पोहच करण्यात येत असून घराघरातून चटणी भाकरी जमा करण्यात आली आहे..

Manoj Jarange: राज ठाकरे कुचक्या कानाचे, मनोज जरांगे पाटील यांची टीका

राज ठाकरे कुचक्या कानाचे

मनोज जरांगे पाटील यांची टीका

मंत्री, आमदार सगळे नासके आहेत

आमची मागणी संविधानाला धरून

ही लढाई आरपारची, मराठे आता घरी थांबणार नाहीत

Mumbai: मुंबई महापालिका मुख्यालयासमोर अतिरिक्त पोलीस तैनात

मुंबई महापालिका मुख्यालयासमोर अतिरिक्त पोलीस तैनात

राज्य राखीव पोलीस दलासोबतच रॅपिड ऍक्शन फोर्स जवान तैनात

सेल्फी पॉइंट परिसरात आंदोलकांची संख्या वाढू लागतात पोलीस बंदोबस्त वाढायला

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलन मुंबईत पोहोचत आहेत

त्याच पार्श्वभूमीवर सेल्फी पॉइंट परिसरात आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

Manoj Jarange: मुंबईत आमची गर्दी नाही ही वेदना आहे - मनोज जरांगे

मनोज जरांगे -

मुंबईत आमची गर्दी नाही ही वेदना आहे

मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या

मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आलाय

Mumbai: मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरूवात

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरूवात


आजच्या बैठकीत काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष

राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे बैठकिला हजर

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी - उदय सामंत

रत्नागिरी - उपसमितीच्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित राहणार - सामंत

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी -सामंत

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावा की नाही हे त्यांनी स्पष्ट करावे.

उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना प्रतिप्रश्न - सामंत

Maratha Aandolan: मराठा आंदोलकांना जेवणासाठी नांदेडवरून आली २० क्विंटल पोळी भाजी

आरक्षण मिळवण्यासाठी हजारो मोर्चेकरी मुंबई येथे दाखल झाले आहेत.

त्यांच्यासाठी नांदेड येथून राज्य राणी एक्सप्रेस मधून 20 क्विंटल पोळी भाजी आली

मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जेवण पोहचले

Pune: शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

पुणे -

शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

उरळी कांचन येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर शरद पवार पुण्यातील निवासस्थानी जातील

दुपारी साधारण ३ वाजता शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना होणार

संध्याकाळच्या सत्रात शरद पवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का हे पाहणे महत्त्वाचे

मनोज जरांगे यांच्याशी आज शरद पवार संवाद साधण्याची शक्यता

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी केली तपासणी, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती

मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी तपासणी केली

जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम आझाद मैदानावर आली

जरांगेंची बीपी आणि शूगर तपासण्यासाठी डॉक्टर आले

मनोज जरांगेंनी शूगर तपासणीसाठी दिला नकार

सर्वकाही नॉर्मल असल्याची डॉक्टरांची माहिती

Pune: पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना

पुणे -

पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर दिसणार नाहीत

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालयाचे उद्घाटन प्रसंगी दोन्ही नेते एकाच मंचावर येणार होते

सकाळी १०.३० वाजता उरळी कांचन येथे कार्यक्रम संपन्न

अजित पवार मात्र मुंबईच्या दिशेने रवाना

मुख्यमंत्र्यांनी भेटायला जायचे नसते तर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची असते; चंद्रकांत पाटील यांच धक्कादायक वक्तव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्या भेटीबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे धक्कादायक विधान केले आहे. मुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद आहे. उठून लगेच जरांगे यांना भेटायला जायचे नसते. तर त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटायला यायचे असते. चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. अन्यथा अपमान करून घ्यायचा का असा प्रश्न ही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कोल्हापूरच्या शिये फाटा येथे किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार

किरकोळ वादातून झालेल्या भांडणात थेट गोळीबार केल्यामुळे कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या शिये फाटा परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत प्रसंगावधान दाखवत जमावातील एका तरुणाने संशयताचा हात वर केला त्यामुळे तीन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या आणि एकाचा जीव वाचला. गोळीबारानंतर आरोपीने स्वतः शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. गणेश अर्जुन शेलार असं संशयित गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. दरम्यान रात्री घडलेल्या या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसांनी झाली आहे.

पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार

गणेशोत्सवात शहर व जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे

पुणे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार आज पासून म्हणजे गौरी आगमन ते २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) या दिवशी विक्री बंद राहील

विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मिरवणूक संपेपर्यंत दुकाने बंद ठेवावी लागतील

याआधी दहा दिवस मद्यविक्री बंदीचा आदेश होता; मात्र उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती

कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली हे सुधारित आदेश काढले आहेत

मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना सी एस एम टी स्थानकासमोरील एका बाजूचा रस्ता मोकळ्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जॉईन कमिशनर सत्यनारायण चौधरी आणि डीसीपी मुंडे यांनी या ठिकाणी आंदोलकांना सीएसएमटी स्थानकासमोरील एका बाजूचा रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्राम सचिवालयाचे उद्घाटन प्रसंगी दोन्ही नेते एकाच मंचावर

आज सकाळी १०.३० वाजता उरळी कांचन येथे संपन्न होणार कार्यक्रम

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : राजकीय आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोल

मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी धडपड सुरू असल्याची जोरदार टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसीबीसी व ई डब्ल्यूएस मधून आरक्षण दिले होते. परंतु मनोज जरांगे यांना ते मान्य नव्हते. त्यांना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षण हवे आहे. यासाठीच त्यांचे आंदोलन सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील जवळपास 58 लाख कुणबी नोंदी शोधून त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. सर्व प्रश्न सोडले सोडवले असतानाही आता केवळ राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरू नये असे आव्हाने मंत्री पाटील यांनी केले आहे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता रॉयलस्टॉन निवासस्थानी विखे पोटी यांनी समितीची बैठक बोलवली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवण्यात आली.

संत नामदेव व्यायाम शाळेचा खाटू श्याम मंदीराचा देखावा

नाशिकच्या येवला शहरातील संत नामदेव व्यायाम शाळेकडून गणेशोत्सवा निमित्त दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करीत असतात.यंदा मंडळाने राजस्थान येथिल प्रसिद्ध खाटू शाम मंदीराचा धार्मिक देखावा सादर केला असून देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे.देखाव्याची खासियत म्हणजे सजावटीसाठी लागणारी विविरंगी व दुर्मिळ फुले थेट आसाम येथून आणण्यात आली आहेत.आर्कषण फुलांनी नटलेले खाटू श्याम मंदिर गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा बांधवांसाठी राज्यभरातून नाश्ता, भाकर, चहा, बिस्किट, पाणी दाखल

आझाद मैदानात मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यभरातून भाकरी चहा नाश्ता दाखल झाला आहे.

आठ हजारापेक्षा भाकरी चपात्या दाखल

दोन दिवसांमध्ये मराठा बांधवांची गैरसोय झाली होती त्यामुळे राज्यभरातला मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे

मांजरा धरणाची हॅट्रिक,सलग तिसऱ्यांदा तुडुंब

धाराशिवसह लातुर व बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण यंदा सलग तिसऱ्यांदा तुडुंब भरले आहे.अॉगस्ट महीन्यातच धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने कळंब तालुक्यासह परीसरातील तब्बल १८ हजार २२३ हेक्टर शेतीला पाणीपुरवठ्याची हमी मिळाली आहे.धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खडकी,लोहटा पुर्व पश्चिम, करंजकल्ला,कोथळा,हिंगनगाव, दाभा,आवाड शिरपुरा,सौंदना अंबा, वाकडी आदी गावांचा शिवार पुन्हा हिरवाईने नटणार आहे.

दहावी बारावी परीक्षेच्या खासगी 17 नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

दहावी बारावी परीक्षेच्या खाजगी 17 नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

15 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना भरता येणार 17 नंबर अर्ज

31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे आता पंधरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार

1110 रुपये परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार

बीड जिल्हा बंदचे आवाहन

आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनकडून बीड जिल्हा बंदची हाक दिली असून एक दिवस बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्व कृषी विक्रेता साहित्य असोसिएशन कडून पाठिंबा देण्यात येत आहे.

'वर्षभराचे स्वप्न डोळ्यांसमोर वाहून गेली,आम्ही जगायचं कसं'?

ऐरवी वारा, वादळ, विंचूकाटा उशाला घेऊन झोपणारा शेतकरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्यूहात अडकला असून यवतमाळ जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभराच्या स्वप्नांची राखरांगोळी झालीये.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय

मनसेकडून मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था

मनसेकडून मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आठ हजार चपात्या अडीच हजार भाकरी मिरचीचा ठेचा भाजी देण्याची व्यवस्था मनसे कडून करण्यात आली होती सामाजिक बांधिलकी जपत मराठा बांधवांसाठी आम्ही जेवण देण्यात आलं अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली

सामाजिक संस्था मराठा तरुणांकडून मराठा बांधवांची खाण्याची व्यवस्था

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मराठा बांधव मुंबईत दाखल झाला आहे मात्र दोन दिवसांमध्ये मराठा बांधवांची खाण्याची राहण्याची गैरसोय झाली होती अखेर राज्यभरातला मदतीचा हात सध्या सुरू झाला आहे मराठा बांधवांना खाण्याची व्यवस्था ठाणे जिल्ह्यातील तरुण आणि पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी केली आहे

Manoj Jarange Patil Protest Live Updates : दुसरा मुक्काम प्लॅटफॉर्मवरच

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातला मराठा बांधव आझाद मैदानावर आलेला आहे मात्र त्यांना प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागत आहे लोकल प्लॅटफॉर्म आणि एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर मराठा बांधव झोपलेले दिसून येत आहेत त्यामुळे क्षणभर विश्रांती घेण्यासाठी प्लॅटफॉर्मचा उपयोग मराठा बांधवांनी केला आहे

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आरक्षण मिळण्यासाठी चक्क मराठा बांधव सायकल वरून मुंबईत पोचले आहेत

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सायकलवरून कोल्हापूर जिल्ह्यावरून थेट आझाद मैदानामध्ये दाखल झाले आहेत चार दिवसापासून सायकल प्रवास करत मुंबईत पोहोचले आहेत आरक्षण मिळल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही असा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील या मराठा बांधवांनी केलेला आहे

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मध्यरात्री सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता अभियान सुरू

मुंबईच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबई दाखल झाला आहे त्यामुळे रस्त्यांवर प्लास्टिक पिशव्या या रस्त्यावर दिसून येत आहेत मध्यरात्रीपासून मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी स्वच्छता करताना दिसून येते याचाच आढावा घेतला आहे

Manoj jarange patil protest live updates : सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात,   जीवनावश्यक वस्तू मुंबईत दाखल

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates: मराठा बांधवांची दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे मराठा बांधवांकडून आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईमध्ये सामाजिक संस्था मराठा महासंघ यांच्याकडून मदतीचा ओघ मुंबईमध्ये सुरू झाला आहे.

मुंबईमध्ये दोन लाख लोकांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू यामध्ये तांदूळ बटाटा कांदा गॅस कडधान्य भाजी मसाले शेगडी गॅस सिलेंडर, जेवण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे सर्व वस्तू आणण्यात आले आहेत.

Manoj jarange patil protest live updates : मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा तिसरा दिवस,   राज्यभरातून मराठा बांधव आझाद मैदानात

मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अमरण उपोषण करत आहे आजचा तिसरा दिवस आहे राज्यभरातले लोकल एक्सप्रेस बसने मराठा समाज आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे तसेच रात्री मुख्यमंत्री विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याच बैठक पार पडली मुख्यमंत्र्यांनी उपस समितीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका मांडली आहे

Manoj jarange patil protest live updates : मुंबईतील मराठा बांधवांसाठी कळंबहून एक क्विंटल शेंगा चटणी 

:मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या मांडुन बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचुन हाल होऊ नयेत यासाठी थेट कळंब हुन मुंबईला खाद्यसामग्री रसद पुरवली जात आहे.घरोघरी थाटलेल्या भाकरी कांदा चटणी बिस्कीटे ते अगदी औषधी इत्यादी साहीत्य घेवुन राञी तीन मालवाहु वाहने मुंबईकडे रवाना झाली आहे.मुंबईतील आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने बांधव दाखल झाले असुन त्यांच्या खाण्या पिण्याचे हाल होत असल्याने कळंब शहर व तालुक्यातुन मोठ्या संख्येने मदतीसाठी हात सरसावले एक घर दोन भाकरी असा सोशल मिडीयावर मॅसेज फिरला अन् नागरीकांनी भरभरून देत तिन वाहने मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मराठ्यांची रस्त्यावर अंघोळ

मुंबईमध्ये मराठ्यांची रस्त्यावर आंघोळीला सुरुवात झाली. आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस असल्यामुळे मराठा बांधव रस्त्यावर आंघोळ करायला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : वाशी प्लॅटफॉर्मवर मराठा बांधवांचा मुक्काम

मनोज रंगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा बांधव मुंबई दाखल झाला आहे. मुंबईतील प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे नवी मुंबई शहरातील वाशी या प्लॅटफॉर्मवर मराठा बांधवांनी मुक्काम केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com