मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
मुंबईत मराठा समाजाने बीएमसीसमोर ठिय्या आंदोलन करून वाहतूक ठप्प केली आहे.
सरकारने भूमिका स्पष्ट करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावात जाणार असल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Why Eknath Shinde visited Daregaon today आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषण करत आहेत, दुसरीकडे मराठ्यांनी मुंबई जॅम केली आहे. बीएमसीसमोर ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय. जोपर्यंत आरक्षणाबाबत सरकार भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मराठा आंदोलकांची आहे. मुंबईमध्ये एकीकडे मराठ्यांचा चक्काजॅम सुरू असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आज दुपारी दरे गावात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज आपल्या मूळ गावी जाणार आहेत.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना आऱक्षणाचा शब्द दिला होता. त्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी दोन वर्षांपूर्वी आपलं आंदोलन थांबवले होते. पण आरक्षण काही मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आझाद मैदानात शुक्रवारपासून त्यांनी अमरण उपोषण सुरू केलेय. दुसरीकडे मराठे मुंबईत आक्रमक आंदोलन करत आहेत. त्यामुळे सरकार काय भूमिका घेणार? एकनाथ शिंदेंच्या नेमकी भूमिका काय असेल? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण एकनाथ शिंदे दरे गावात जाणार असल्याचे वृत्त आता समोर आलेय. एकीकडे मराठे रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे शिंदे अचानक दरेगावात निघाले आहेत, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मूळ गाव दरे गावात जाणार आहेत. मराठा आंदोलक मुंबईत आहेत, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात का जात आहेत? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अमित शाह लालबाग राजाचे दर्शन घेऊन मुंबईतून परतल्यानंतर शिंदे दरेगावात निघणार आहे. दुपारी ते आपल्या मूळ गावी पोहचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईमध्ये आंदोलन सुरू असताना एकनाथ शिंदे दरेगावात जाणार असल्याचे वृत्त समोर आले अन् एकच राजकीय चर्चेला सुरूवात झाली. आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी शिंदे दरेगावात का जात आहेत? अशी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या घरचा गणपती मूळ गावी दरेगावात आहे. गणरायचे दर्शन घेण्यासाठी आज एकनाथ शिंदे दरे गावात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंचा हा दौरा पूर्वनियोजित नाही, त्यामुळे या दौऱ्यात बदल होऊ शकतो, असेही समजलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.