Unique Car Decoration Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video News: अजब डेकोरेशन अन् गजब एन्ट्री; नवरदेवाच्या गाडीची सजावट बघून डोकं धराल; VIDEO तुफान व्हायरल

Unique Car Decoration Video: लग्नात हटके एन्ट्री करण्याची क्रेझ सध्या पाहायला मिळते. यासाठी नवरा- नवरीच्या गाड्यांची फुलांनी खास सजावटही केलेली असते. मात्र या व्हायरल व्हिडिओमधील नवरदेवाची गाडी फुलांनी नव्हेतर दुकानातील वेफर्स, कुरकुऱ्यांच्या पुड्यांनी सजवल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

Viral Wedding Video:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका लग्नातील व्हिडिओ माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे नवरदेवाची हटके एन्ट्री.

लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.

लग्नात हटके एन्ट्री करण्याची क्रेझ सध्या पाहायला मिळते. यासाठी नवरा- नवरीच्या गाड्यांची फुलांनी खास सजावटही केलेली असते. मात्र या व्हायरल व्हिडिओमधील नवरदेवाची गाडी फुलांनी नव्हेतर दुकानातील वेफर्स, कुरकुऱ्यांच्या पुड्यांनी सजवल्याचे दिसत आहे. अशा हटके पद्धतीने लग्नाची गाडी सजवल्याचे याआधी तुम्ही कधी पाहिले नसेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेवाची गाडी दुकानातील असंख्य स्नॅक्सच्या पुड्यांनी सजवली आहे. गाडीवर कुरकुरे, वेफर्सचे पुडे दिसत आहेत. संपूर्ण गाडी याच पुड्यांनी झाकून गेली आहे. नवरदेवाची ही गाडी इतकी हटके दिसतेय की प्रत्येकजण त्याकडे पाहत आहे. @desimojito नावाच्या एक्स अकांउटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी नवरदेवाची टपरी आहे का? असा मजेशीर सवाल उपस्थित केला आहे. तर काही जणांनी लग्नाला चालला की दुकान टाकायला? असे म्हणत त्याची फिरकीही घेतली. अनेकांनी त्याच्या या खास सजावटीचे कौतुकही केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT