Madhya Pradesh Politics: काँग्रेसला बसणार आणखी एक धक्का, माजी मुख्यमंत्री सोडणार पक्षाची साथ?

Kamal Nath News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
Kamal Nath
Kamal NathSaam Tv
Published On

Madhya Pradesh Politics:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर कमलनाथही भाजपमध्ये सामील झाल्यास लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा फटका बसू शकता, अशी चर्चा आहे.

याच चर्चेदरम्यान कमलनाथ यांनी दिल्ली गाठून मौन सोडले आहे. अशी कोणतीही गोष्ट असल्यास त्याची माहिती आपण स्वतः देऊ, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. जेव्हा पत्रकारांनी कमलनाथ यांना विचारले की, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नांना नकार देत नाही आहे. त्यावर ते म्हणाले, नकार देण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kamal Nath
Jnanpith Award 2023: मोठी बातमी! प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत कमलनाथ पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, तुम्ही लोक एवढ्या उत्साहात का आहात? असे काही घडल्यास, मी तुम्हाला सर्वातआधी सांगेन. यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले की, तुम्ही यावर नकार दिला नाही? यावर कमलनाथ म्हणाले की, नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. हे तुम्ही लोक म्हणताय. मी नाही. असे काही घडल्यास, मी सर्वातआधी तुम्हा सर्वांना माहिती देईन. (Latest Marathi News)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ त्यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा दौऱ्यावर होते. तेथून ते नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा मुलगा नकुलनाथ यांनी 2019 च्या निवडणुकीत छिंदवाडा मतदारसंघात विजय मिळवला होता. तर भाजपने राज्यातील उर्वरित 28 जागा जिंकल्या होता.

Kamal Nath
Sony आणि Samsung चे 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त, मिळत आहे जबरदस्त ऑफर

यातच कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेबद्दल विचारले असता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह सांगितले होते, "मी काल रात्री 10.30 वाजता कमलनाथ यांच्याशी बोललो, ते छिंदवाडा येथे आहेत. एक व्यक्ती ज्याने आपले राजकीय प्रवासाची सुरुवात येथून केली आणि इंदिरा गांधींना जनता पक्षाने तुरुंगात पाठवले तेव्हा नेहरू-गांधी परिवाराच्या पाठीशी उभा राहिलो, अशी व्यक्ती कधी काँग्रेस आणि गांधी घराणे सोडेल, असे तुम्हाला वाटते का?"

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेची जागा न मिळाल्याने कमलनाथ नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच गेल्या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जातात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कमलनाथ यांना पक्षाच्या मध्य प्रदेश युनिटच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशची धुरा युवा चेहरा जितू पटवारी यांच्याकडे सोपवली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बंपर विजय मिळाला होता. 230 सदस्यांच्या सभागृहात भाजपने 163 जागा जिंकून सत्ता राखली. दुसरीकडे काँग्रेसला केवळ 66 जागा जिंकता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com