Jnanpith Award 2023: मोठी बातमी! प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

Gyanpith Puraskar 2023: प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
famous urdu poet gulzar
famous urdu poet gulzarSaam Tv
Published On

Jnanpith Award 2023:

प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत निवड समितीने ही माहिती दिली आहे. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत.

अनेक चित्रपटांमध्ये गाणी लिहिण्यासोबतच गुलजार यांनी गझल आणि कविता क्षेत्रात नावलौकिक मिळवलं आहे. तर जगद्गुरु रामभद्राचार्य हे संस्कृत भाषा आणि वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

famous urdu poet gulzar
Sony आणि Samsung चे 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त, मिळत आहे जबरदस्त ऑफर

गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कामांसाठी ओळखले जातात. ते या काळातील उत्कृष्ट उर्दू कवी मानले जातात. याआधी त्यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विविध कामांसाठी त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरु, शिक्षक आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. (Latest Marathi News)

famous urdu poet gulzar
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला समोर, वाचा

ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, हा पुरस्कार (2023 साठी) दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातील लेखक दामोदर मौजो यांना 2022 चा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com