Sony आणि Samsung चे 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त, मिळत आहे जबरदस्त ऑफर

Amazon Deals Offers on Tvs: जर तुम्ही 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, Amazon वर मिळत असलेली बंपर डील तुमच्यासाठी ठरू शकते फायदेशीर.
Amazon Deals Offers on Tvs
Amazon Deals Offers on TvsSaam Tv
Published On

Amazon Deals Offers on Tvs

जर तुम्ही 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, Amazon वर मिळत असलेली बंपर डील तुमच्यासाठी ठरू शकते फायदेशीर. या धमाकेदार डीलमध्ये, सोनी आणि सॅमसंगचे 50 इंची टीव्ही मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहेत. तुम्ही आकर्षक बँक ऑफर्ससह सेलमध्ये हे टीव्ही देखील खरेदी करू शकता.

या टिव्हीवरती तुम्हाला 3,000 रुपयांची बँक ऑफरही मिळत आहे. याशिवाय एक्सचेंज बोनससह हे स्मार्ट टीव्ही आणखी स्वस्तात तुम्ही खरेदी करू शकता. असं असलं तरी सवलत तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती, ब्रँड आणि एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. हे टीव्ही सेलमध्ये EMI वर देखील खरेदी केले जाऊ शकतात. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amazon Deals Offers on Tvs
Ola घेऊन आली 14 दिवसांसाठी Valentine’s Day गिफ्ट ऑफर, इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे 25000 रुपयांची सूट

Sony Bravia 126 cm (50 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-50X70L (Black)

सोनी कंपनीच्या या टीव्हीची किंमत सेलमध्ये 55,090 रुपये झाली आहे. बँक ऑफर्समध्ये हा टीव्ही 3,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या टीव्हीची किंमत आणखी 2710 रुपयांनी कमी करू शकता. या टीव्हीचा ईएमआय 2671 रुपयांपासून सुरू होतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. पॉवरफुल साऊंडसाठी कंपनी या टीव्हीमध्ये ओपन बॅफल स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओसह 20-वॉट स्पीकर सेटअप देत आहे. (Latest Marathi News)

Sony Bravia 126 cm (50 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-50X64L (Black)

सेलमध्ये या टीव्हीची किंमत 54,990 रुपये झाली आहे. यावर 3 हजार रुपयांपर्यंत बँक सवलतही दिली जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत 2710 रुपयांपर्यंत कमी करू शकता. हा टीव्ही तुम्ही 2,666 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. हा टीव्ही ओपन बॅफल स्पीकरने सुसज्ज आहे. जो डॉल्बी ऑडिओ आणि 20 वॉट स्पीकर सेटअपसह येतो.

Amazon Deals Offers on Tvs
Smartphone: Galaxy A34 5G स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या किंमत

Samsung 125 cm (50 inches) Crystal iSmart 4K Ultra HD Smart LED TV UA50CUE60AKLXL (Black)

सॅमसंगचा हा टीव्ही तुम्ही 42,990 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीवर 3 हजार रुपयांपर्यंत सूटही दिली जात आहे. या टीव्हीवर 2710 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. टीव्हीचा EMI 2084 रुपयांपासून सुरू होतो. या टीव्हीमध्ये तुम्हाला 50Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. टीव्हीमध्ये कंपनी अडॅप्टिव्ह साउंडसह 20 वॅट स्पीकर सेटअप देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com