Ola घेऊन आली 14 दिवसांसाठी Valentine’s Day गिफ्ट ऑफर, इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे 25000 रुपयांची सूट

Ola Valentine’s Day Offer: व्हॅलेंटाईन डे संपला असला तरी, तुम्हाला त्याचं गिफ्ट आताही मिळू शकतं. आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपली व्हॅलेंटाईन डे ऑफर जाहीर केली आहे.
Ola Valentine’s Day Offer
Ola Valentine’s Day OfferSaam Tv
Published On

Ola Valentine’s Day Offer:

व्हॅलेंटाईन डे संपला असला तरी, तुम्हाला त्याचं गिफ्ट आताही मिळू शकतं. आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपली व्हॅलेंटाईन डे ऑफर जाहीर केली आहे. यामुळे ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे.

कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी या ऑफरची घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केली आहे. ही ऑफर 16 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून लागू झाली आहे. ग्राहकांना 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ola Valentine’s Day Offer
RBI चा Paytm युजर्सला मोठा दिलासा! आता या तारखेपर्यंत वापरू शकता पेटीएम पेमेंट बँक

व्हॅलेंटाईन ऑफरची संपूर्ण माहिती

Ola ची व्हॅलेंटाईन ऑफर S1 X+, S1 Air आणि S1 Pro वर उपलब्ध असेल. या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या एक्स-शोरूम किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, S1 X+ ची किंमत 109,999 रुपये, S1 Air ची किंमत 119,999 रुपये आणि S1 प्रोची किंमत 147,499 रुपये आहे. यातच ऑफरनंतर, S1 X+ ची किंमत 84,999 रुपये, S1 Air ची किंमत 104,999 रुपये आणि S1 प्रोची किंमत 129,999 रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला S1 X+ वर 25,000, S1 Air वर 15,000 आणि S1 Pro वर 17,500 रुपयांचा लाभ मिळेल. (Latest Marathi News)

जानेवारीत 31 हजार स्कूटरची विक्री

दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये विक्रमी विक्रीसह ओला पुन्हा एकदा नंबर-1 इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ठरली आहे. कंपनीने सांगितले की, वाहन पोर्टलनुसार, जानेवारीमध्ये त्यांच्या 31,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी झाली होती.

Ola Valentine’s Day Offer
Smartphone: फोन घ्यायचा विचार करताय? दमदार फीचरसह Honor X9b बाजारात लाँच; जाणून घ्या किंमत

या विक्रीसह पास विभागात त्याचा 40% बाजार हिस्सा होता. कंपनीसाठी ही महिन्यातील सर्वात मोठी विक्री देखील आहे. यात जानेवारी 2023 च्या आधारे वार्षिक 70% वाढ झाली. डिसेंबरमध्ये ओला इलेक्ट्रिक एका महिन्यात 30,000 विक्री करणारी पहिली इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ठरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com