काही महिने युद्ध सुरूच राहणार? इराणचं सरकार ठाम, ट्रम्प यांना फुटला घाम

Iran War May Continue For Months Report: इराणसोबतच्या संघर्षाला आता तिसरा आठवडा सुरू झाला असताना अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र आहे. इराण युद्धात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चुका भोवल्यात. त्यामुळे युद्ध थांबणार नाही तर आणखी काही महिने सुरुच राहणार असल्याची भिती आहे. पाहूया एक रिपोर्ट...
Rising tensions between the US and Iran as the conflict enters its third week, with global powers showing reluctance to support Washington.
Rising tensions between the US and Iran as the conflict enters its third week, with global powers showing reluctance to support Washington.Saam Tv
Published On

आखाती युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसतायेत. गॅस टंचाईने भारतातही जनता बेजार झालीये. त्यामुळे युद्ध कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...मात्र युद्ध थांबणार नाही तर आणखी काही महिने सुरुच राहणार असल्याचं पुढं आलंय.

इराणविरोधातल्या संघर्षाला आता तिसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. कारण नाटो मित्रराष्ट्रांनी इराणविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्यास नकार दिलाय. खरं म्हणजे ट्रम्प यांना अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या अहवालाकडे दुर्लक्ष करणं भोवल्याचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टनं दिलंय. य़ा अहवालात नेमकं काय नमूद करण्य़ात आलंय ते पाहूयात....

१) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि 40 वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेले तरी इराणने माघार घेतली नाही. त्यामुळे अमेरीकेच्या अंदाजानुसार तिथं सत्ता परीवर्तन झालं नाही.

२. केवळ हवाई हल्ल्यांच्या जोरावर इराणमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणणे शक्य होणार नाही. उलट तिथल्या राजवटीची सत्ता आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे असा इशारा सीआयएने दिला होता.

३) ट्रम्प यांना बेजबाबदार विधानेही भोवली आहेत. इराणवर बॉम्ब टाकताना मला मजा येते. हे हल्ले करताना सैनिक त्याचा "आनंद" घेत आहेत, या विधानांवरुन संताप व्यक्त होत आहे.

४) इराणने होर्मूझचा जलमार्ग बंद केल्यावर ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याची भाषा केली होती. मात्र पुन्हा त्यांनी इराणवर मोठे हल्ले केलेत. त्यामुळे अनेक राष्ट्रांचा ट्रम्प यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.

हे युद्ध अमेरीकेला चांगलंच जड जातंय. इराणने दीर्घ काळ लढण्याचा इशारा दिलाय. शत्रू राष्ट्रांच्या निम्म्याहून अधिक युद्धनौकांचा नाश झाला असला तरी इराण त्वेषाने लढतोय. त्यामुळे युद्धविरामाबाबतचा संभ्रम आहे. सुरुवातीच्या 15 दिवसातच मध्य-पूर्वेतील युद्धाच्या झळांनी सामान्य जनता होरपळली आहे. जर युद्ध आणखी जास्त काळ लांबलं तर त्याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com