10वीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी, परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली

SSC Exam Security Breach: राज्यातील पेपरफुटीची प्रकरणी थांबवण्याचं नाव नाही... अशातच सोलापुरात अज्ञातांनी भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी केलीय... मात्र ही चोरी नेमकी कशी झाली? कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियानाचा कसा बोजवारा उडालाय... पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...
Broken strong room lock at Sangola exam center after theft of SSC Geography question papers in Solapur.
Broken strong room lock at Sangola exam center after theft of SSC Geography question papers in Solapur.Saam Tv
Published On

दहावीच्या बोर्ड परिक्षेची सुरक्षा आता रामभरोसे असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलयं... परीक्षेच्या आदल्या रात्रीच सोलापुरातील सांगोला विद्या मंदिर प्रशालेतून स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भूगोलाच्या तब्बल 50 प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा लंपास केलाय...धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी या गोपनीय प्रश्नपत्रिका ठेवल्या होत्या, त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं ही समोर आल्यानं एकच खळबळ माजलीय....

दरम्यान प्रश्नपत्रिक चोरी प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केलाय... चोरीच्या तपासासाठी सोलापूरहून फॉरेन्सिक टीम सांगोल्यात दाखल झालीय. या फॉरेन्सिक टीममध्ये पाच ते सहा अधिकारी सहभागी झाले असून ते कसून तपास करत आहेत... दोषींवर तातडीनं कारवाईचं आश्वासन अपर पोलीस अधीक्षकांनी दिलंय...

दुसरीकडे याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानेही गंभीर दखल घेतलीय... मात्र प्रश्नपत्रिका फुटी नंतर आता भूगोलाचा पेपर नियोजित वेळेलाच होणार की पुढे ढकलला जाणार? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.. याआधी राज्यात पेपरफुटीच्या घटना कुठे कुठे घडल्यात.. पाहूयात...

27 फेब्रुवारी 2026

नागपूर

व्हॉटसअॅप ग्रुपवर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर पुरवला

5 मार्च 2026

बीड

जातेगावमध्ये 10वी च्या हिंदीच्या पेपरला चक्क झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली

6 मार्च 2026

अमरावती

अंजनगाव सुर्जीमध्ये 10वीचा उर्दु आणि इंग्रजीचा पेपर चोरीला

11 मार्च 2026

पुणे

परीक्षेच्या तीन दिवस आधीच बीजगणित आणि भूमितीचा पेपर टेलिग्रामवर

खरंतर कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून सरकारने परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत... मात्र हेच सीसीटिव्ही कॅमेरे बंद असतील आणि स्ट्रॉग रुममधून पेपर चोरीला जात असतील तर शिक्षण व्यवस्थेचा लागलेली कॉपीची कीड कधी संपणार? एकीकडे कॉपीला खतपाणी घालणारे शिक्षक आणि पेपर फोडणाऱ्या टोळक्यांनी धुमाकुळ घातलेला असताना स्ट्राँग रुममधून पेपरची चोरी करण्याचं धाडस नेमकं येतं कुठून? राज्यातील पेपर फुटीचं हे रॅकेट कसं उद्धवस्त होणार? हे पाहणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com