Cricket Match Viral Video
Cricket Match Viral VideoSaamtv

Cricket Match Video: भगवा पोशाख, कपाळी टिळा अन् संस्कृतमध्ये कॉमेंट्री; वाराणसीत रंगला अनोखा क्रिकेटचा सामना, VIDEO व्हायरल

Cricket Match Viral Video: वाराणसीमधील एका क्रिकेट सामन्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Published on

Varanasi Cricket Match Viral Video:

भारतात सर्वात जास्त खेळला जाणारा, लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेटप्रेमींची संख्या काही कमी नाही. गावागावात, गल्लीबोळात क्रिकेटचे डाव रंगतात. सध्या वाराणसीमधील एका क्रिकेट सामन्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओचा अन् क्रिकेटच्या सामन्याचा किस्सा? जाणून घ्या सविस्तर.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) वाराणसीमध्ये रंगलेला एक क्रिकेटचा सामना सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या सामन्यामध्ये वेदपाठीचे विद्यार्थी चक्क पारंपारिक पोशाख म्हणजे भगव्या रंगाचा धोतर- कुर्ता अन् कपाळावर टिळा लावून क्रिकेट खेळत होते. विशेष म्हणजे या सामन्याची कॉमेन्ट्री सुद्धा संस्कृत भाषेत सुरू होती.

संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या श्री शास्त्रार्थ महाविद्यालयाच्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त या संस्कृत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. रामपुरामधील जयनारायण इंटर कॉलेज मैदानात हा क्रिकेटचा डाव रंगल्याचे सांगण्यात येत आहे. . या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cricket Match Viral Video
Tamil Nadu News: मोठी दुर्घटना! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा मृत्यू, ६ जखमी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेदपीठाचे विद्यार्थी भगव्या, पिवळ्या रंगाचे धोतर, कुर्ते तसेच कपाळावर टिळा लावून मैदानावर उतरलेत. विशेष म्हणजे सामन्याआधी खेळाडूंची एन्ट्री ही मंत्र- वेदाचे पठण करत झाली. यावेळी खेळाडूंनी चौकार- षटकारांची बरसात केली. या सामन्याची कॉमेन्ट्रीही संस्कृत भाषेत सुरू आहे. (Latest Marathi News)

Cricket Match Viral Video
Eknath Shinde: एक पत्र आलं अन् ५० कोटी मागितले; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com