IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वालने शतक झळकवल्यानंतर बाद नसतानाही मैदान का सोडलं? कारण आलं समोर

yashasvi jaiswal News update : भारताचे फिजिओ दोन वेळा मदतीला आले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे यशस्वीला माघारी जावं लागलं. त्यानंतर फलंदाजीसाठी चौथ्या क्रमाकांवर हा रजत पाटीदार खेळण्यासाठी मैदानावर उतरला.
yashasvi jaiswal
yashasvi jaiswalSaam tv
Published On

yashasvi jaiswal News :

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे. राजकोटमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या डावात यशस्वीने दमदार शतक ठोकलं. यशस्वीने १०४ धावा केल्यानंतर त्याच्या कमरेत दु:खू लागलं. त्यामुळे भारताचे फिजिओ दोन वेळा मदतीला आले. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे यशस्वीला माघारी जावं लागलं. त्यानंतर फलंदाजीसाठी चौथ्या क्रमाकांवर हा रजत पाटीदार खेळण्यासाठी मैदानावर उतरला. (Latest Marathi News)

राजकोटमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा १९ धावा करून बाद झाला. रोहित शर्मा बाद झाला, त्यावेळी भारताची धावसंख्या ३० होती. त्यानंतर यशस्वी जैस्वालने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी मिळून १५५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर जैस्वालने मैदान सोडलं.

yashasvi jaiswal
Ravindra Jadeja Record: अश्विननंतर जडेजानेही रचला इतिहास! पूर्ण केल्या 500 विकेट्स

यशस्वीने रिटायर हर्ट होण्याआधी १०४ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने १३३ चेंडूत १०४ धावा केल्या. यशस्वीने ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने शतक ठोकलं. यशस्वीने कसोटी सामन्यातील तिसरं शतक ठोकलं. तर राजकोटमध्ये यशस्वीने पहिलं शतक झळकावलं आहे.

yashasvi jaiswal
Sunil Gavaskar: काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियावर दिग्गज खेळाडू नाराज; वाचा संपूर्ण प्रकरण

यशस्वीने अचानक मैदान का सोडलं?

यशस्वीने १०३ धावा केल्यानंतर अचानक त्याच्या कमरेला त्रास जाणवू लागला. त्यामुळे अचानक जागेवरच बसला. त्यानंतर तातडीने भारताचे फिजिओ मैदानार आले. त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर पुन्हा यशस्वी खेळू लागला. मात्र, यशस्वीने एक धाव काढल्यानंतर त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे फिजिओ पुन्हा मैदानावर आले. उपचारानंतर यशस्वीने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्याला वाटलं की, आता फलंदाजी करणं अशक्य आहे. त्यामुळे यशस्वीने मैदान सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com