ravindra jadeja
ravindra jadejasaam tv news

Ravindra Jadeja Record: अश्विननंतर जडेजानेही रचला इतिहास! पूर्ण केल्या 500 विकेट्स

India vs England 3rd Test: तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने देखील ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. यासह मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
Published on

IND vs ENG 3rd Test, Ravindra Jadeja Record:

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी आर अश्विनने ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. आता तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने देखील ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. रविंद्र जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद केले आहेत.

राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात झॅक क्रॉलीला बाद करताच अश्विनने ५०० कसोटीत ५०० गडी बाद केले. अश्विननंतर जडेजाने हा पल्ला गाठला आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात २ गडी बाद केले. दरम्यान गोलंदाजीला येण्यापूर्वी त्याने शतकी खेळी केली.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील रविंद्र जडेजाच्या फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. हैदराबाद कसोटीत जडेजाने ५ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना त्याने ८७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो २ धावांवर माघारी परतला होता. (Cricket news in marathi)

ravindra jadeja
IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० खेळाडूंसह खेळावं लागणार; मोठं कारण आलं समोर

इंग्लंडचा संपूर्ण डाव ३१९ धावांवर संपुष्टात..

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन डकेटने सर्वाधिक १५३ धावांची खेळी केली.

ravindra jadeja
IND vs ENG 3rd Test: सिराजचा फटका, इंग्लंडला झटका; पाहुण्यांचा संघ 319 वर ऑलआऊट! टीम इंडियाकडे मोठी आघाडी

तर उर्वरीत कुठल्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४४५ धावा केल्या. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com