सध्या शाळकरी मुलांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. या घटनांचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. शाळेकडून अनेकदा या घटनेची दखल घेतली जाते. (latest viral news)
छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) दहावीतील शाळकरी मुलांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाकीच्या काही विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काही काळानंतर शमला होता. शाळेतील किरकोळ वादावरून भांडण (School Student Fight) झाल्याचं सांगितलं जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विद्यार्थ्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी
हा व्हिडिओ संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन (Bidkeen Village) गावातील आहे. बिडकीन गावातील एका शाळेत ही घटना घडली आहे. शाळेच्या परिसरातून हा व्हिडीओ समोर आला (School Student Film Style Fight) आहे. विद्यार्थ्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. या हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मुलं एकमेकांना ब्लेटने मारहाण करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक मोठा घोळका शाळेच्या परिसरात उभा असल्याचं दिसत आहे. त्यांच्यमध्ये काहीतरी बोलणं सुरू असल्याचं (Viral Video) दिसतंय. नंतर काहीतरी कारणावरून वाद होताना दिसतोय. अचानक शांतपणे चर्चा सुरू असताना विद्यार्थी आक्रमक होतात. त्यानंतर त्यांच्यात फिल्मी स्टाईल हाणामारी सुरू झाली.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे (School Student Fight) व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी हाणामारी करताना दिसत आहेत. या हाणामारीचा संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. या मुलांची हाणामारी बघायला गर्दी जमली होती. त्याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि व्हायरल केला.
सोशल मीडियावर या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. मात्र या मुलांमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला (Sambhajinagar News) होता, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हाणामारीचं कारण अजून गुलदस्त्यातच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.