Biker 5 rupees petrol request SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Vdeo: 5 रूपयाचं पेट्रोल भरा...! पेट्रोल पंपवर आलेल्या बाईकस्वाराची अजब मागणी; पाहा कर्मचाऱ्यांनी काय केलं?

Biker 5 rupees petrol request: सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक बाईकस्वार थेट पेट्रोल पंपावर पोहोचतो आणि कर्मचाऱ्यांना सांगतो की, “५ रुपयांचे पेट्रोल भरा.”

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल प्रत्येकाच्या हातात फोन असतो. अशावेळी कोणतीही वेगळी किंवा मजेशीर घटना घडताना दिसली की त्याचा व्हिडीओ लगेच शूट केला जातो. बरेच लोक ते व्हिडिओ स्वतःकडेच ठेवतात तर काही लोक ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. व्हिडीओ मजेशीर असल्यास तो व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एका माणसाने पेट्रोल पंपावर असं काम केलंय की त्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण चकित झालेत. या व्यक्तीने पेट्रोल पंपवर नेमकं काय केलंय ते पाहूयात.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक माणूस पेट्रोल पंपावर जातो आणि पाच रुपयांचं पेट्रोल मागतो. यावर पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया खूपच विचित्र होती. शेवटी त्या माणसाने पाच रुपयांऐवजी दहा रुपयांचे पेट्रोल भरलं.

हा मजेशीर भाग इथेच थांबला नाही. १० रूपयांचं पेट्रोल भरून त्याने त्याने ५०० रुपये दिले. आता, १० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला ५०० रुपयांचे सुट्टे देण्यासाठी मोठा वेळ हिशोब करावा लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट केलीये.

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @ashu__x2 या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटलंय की, 'काका खूप दयाळू होते आणि त्यांनी मला मदत केली'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT