Viral Video: डॉगेश भाईचा जलवा! थेट रिक्षाच्या छतावर बसून केला पुण्याच्या रस्त्यावर प्रवास, पाहा Video

Dog viral video Pune: सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. यात एक कुत्रा थेट ऑटो रिक्शाच्या छतावर बसून पुण्याच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो.
Dog viral video Pune
Dog viral video Punesaam tv
Published On

सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही अनेक कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या व्हायरल व्हिडीओबाबत माहिती देणार आहोत असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका कुत्र्याचा असून तुम्ही पाहिल्यानंतरही तुम्हाला हा व्हिडीओ आवडेल.

माहितीनुसार, हा व्हिडीओ पुण्याच्या रस्तावरचा आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून एक रिक्षा धावताना दिसतेय. गंमतीची बाब म्हणजे या रिक्षाच्या छतावर कुत्रा आरामात बसून प्रवास करतोय. रिक्षाच्या छतावर बसून प्रवास करणाऱ्या या कुत्र्याने सर्वांचं लक्ष वेधलंय.

Dog viral video Pune
Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालाय व्हिडीओ

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @gaurav_satish_gawade या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या तु्म्ही हा व्हिडीओ पाहिला तर दिसेल रिक्षाच्या छतावर कुत्रा अगदी आरामात बसला आहे. चालती रिक्षा असूनही तो भुंकत नाही किंवा रिक्षावरून उतरण्याची घाई करत नाहीये. तो आजबाजूने चालणाऱ्या लोकांना बघतोय आणि प्रवास करतोय.

Dog viral video Pune
Viral Video: वेदनेतून सेवेकडे वाटचाल! जिद्दीच्या जोरावर महिलेची कॅन्सरवर मात, लोकलमध्ये गाणी गात कॅन्सरग्रस्तांसाठी जमा करते निधी; VIDEO व्हायरल

इतकंच नाही तर रिक्षा धावत असताना समोर एक स्पीड ब्रेकर देखील आला आहे. मात्र तो ओलांडत असताना देखील कुत्रा अगदी आरामात बसला होता. त्याच्या बसण्याची स्टाईल पाहून जणू त्याला असं बसण्याची सवय असल्याचं लोकांनी म्हटलंय. या व्हिडीओवर 'डॉन महंत्यत डॉन' अस लिहिलंय.

Dog viral video Pune
Viral Video: चक्क मेट्रो स्टेशनवर फिल्मी स्टाईल साखरपुडा; व्हायरल व्हिडीओने वेधलं साऱ्यांचं लक्ष

युझर्सच्या विविध प्रतिक्रिया

कुत्र्याचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागला नाही. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका व्यक्तीने म्हटलंय की, डॉगेश भाईचा जलवा आहे. दुसऱ्या युजरने म्हटलंय की, हळू चावला, डॉगेश भाई येतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com