Viral Video: चक्क मेट्रो स्टेशनवर फिल्मी स्टाईल साखरपुडा; व्हायरल व्हिडीओने वेधलं साऱ्यांचं लक्ष

Roka at Metro Station: मेट्रो स्टेशनवर एका जोडप्याची थेट एंगेजमेंट सेरेमनी झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Roka at Metro Station
Roka at Metro Stationsaam tv
Published On

मेट्रो स्टेशनवर अनेक घटना पहायला मिळतात. दिल्ली मेट्रो असो किंवा मुंबईची मेट्रो काही घटना या सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात. काही व्हिडीओमध्ये भरपूर ड्रामेबाजी असते, तर काही व्हिडीओ हे इमोशनल असतात. सध्या मुंबई मेट्रोच्या स्टेशनवरचा असाच एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एका कपलचा मेट्रो स्टेशनवर त्यांचा रोका म्हणजे विवाहपूर्वी केली जाणारी एक विधी मुलाच्या पालकांनी केली आहे. याशिवाय त्यानंतर रिंग सेरेमनी करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

Roka at Metro Station
Viral Video: मुंबईकरांनो सावधान! लोकलमधून पडून मुलीचा मृत्यू झाला, तिथला नवा व्हिडिओ, दृश्य पाहून तुम्ही डोकं धरून बसाल!

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओची सुरुवात मुलगा आणि त्याचं कुटुंब मेट्रो स्टेशनवर त्याच्या गर्लफ्रेंडची वाट पाहत असताना होते. जसजसा वेळ जातो तसतसं मुलाची आई रागावते आणि निघून जाण्याचा प्रयत्न करते. परंतु मुलगा तिला थांबवतो आणि तिला थोडा वेळ थांबण्यास सांगतो. दरम्यान मुलगा सतत त्याच्या गर्लफ्रेंडशी फोनवर बोलत असतो.

Roka at Metro Station
Viral Video: शॉपिंगसाठी ५ जणी एकत्र आल्या, एकीनं दुकानदाराला गप्पा मारण्यात गुंतवलं, चौघींनी साडीत जिन्स लपवून पळवल्या; CCTV व्हायरल

जेव्हा मुलगी मेट्रो स्टेशनवर येते तेव्हा व्हिडिओमध्ये मुलाची आई तिला आणि मुलाला स्टेशनच्या बाकावर बसवते. यावेळी आई रागाने म्हणते, आम्ही दोन तासांपासून वाट पाहत आहोत. अखेर जी विधी मुलीच्या घरी करायची असते ती विधी मुलाच्या आईकडून मेट्रो स्टेशनवरच करण्यात येते.

या सर्व गोष्टी घडत असताना मुलगी तिच्या वडिलांना फोन करते आणि म्हणते, "बाबा, हे लोक दोन तासांपासून मेट्रो स्टेशनवर वाट पाहतायत, तुम्ही माझं ऐकून घ्या. यानंतर मुलाची आई म्हणते की, रोका सेरेमनी नक्कीच होईल.

Roka at Metro Station
Viral Video: ५ दिवस घरात पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन, दुचाकीवरून थेट कार्यलयात, पाहा व्हिडिओ

मुलाची आई मुलाच्या मित्राला सर्वकाही रेकॉर्ड करण्यास सांगतं. ती असा आग्रह धरते की, व्हिडिओ मुलीच्या वडिलांना पाठवावा जेणेकरून त्यांच्याकडे पुरावा असेल. यानंतर, कुटुंब मेट्रो स्टेशनवरच हा समारंभ पार पाडतात.

Roka at Metro Station
Viral Video: वेदनेतून सेवेकडे वाटचाल! जिद्दीच्या जोरावर महिलेची कॅन्सरवर मात, लोकलमध्ये गाणी गात कॅन्सरग्रस्तांसाठी जमा करते निधी; VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ खरंच घडलेला आहे की फक्त कंटेट म्हणून बनवलाय याबाबत माहिती मिळालेली नाही. वापर सोशल मीडियावर दररोज नवीन ट्रेंड आणि रिल्स येत असल्याने लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com