Fact Check  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : पोलीस रात्री महिलांना गाडीने घरी सोडणार, सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा VIDEO

women security viral message : पोलीस रात्री महिलांना गाडीने घरी सोडणार, असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या योजनेचं नाव मोफत राईड योजना असल्याचा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य.

Mayuresh Kadav

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या सुरक्षेसाठी एक योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत पोलिसांद्वारे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महिलांना घरी सोडण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध असेल. या सेवेसाठी 1091 आणि 7837018555 हे दोन हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेत. आपत्कालीन परिस्थितीत महिला या नंबरवर मेसेज किंवा मिस कॉलसुद्धा देऊ शकतात.

ही सुविधा सगळीकडे उपलब्ध असल्याचे एका पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, ही योजना खरंच महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे का?...ही योजना सुरू असेल तर तिचा लाभ महिलांना कसा मिळेल? याबद्दल खरी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. सरकारने असा कोणता जीआर काढलाय का हे आम्ही पडताळून पाहिलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

आम्ही पोस्टमध्ये शेअर केलेल्या दोन हेल्पलाईन नंबरचा वापर करून तपास सुरू केला.

आम्ही हेल्पलाईन क्रमांक 7837018555 हा नंबर घेऊन गूगलवर सर्च केले.

तेव्हा आम्हाला 2019 मधील एक पोस्ट सापडली ज्यामध्ये महाराष्ट्रातील योजनेचा उल्लेख नव्हता.

चित्तूर, आंध्र प्रदेशमधील महिलांसाठी मोफत राईड योजनेचा उल्लेख आढळून आला.

सिक्कीम, पंजाब, चित्तूर पोलीस रात्रीच्या वेळी महिलांना मोफत राईड देतात.

कर्नाटक पोलीस, लुधियाना पोलिसांनीही हा उपक्रम सुरू केल्याची माहिती मिळाली.

अशा प्रकारे अनेक स्थानिक पोलीसही महिलांना अशी सुविधा देतात.

मात्र, आमच्या पडताळणीत महाराष्ट्रात अशी महिलांसाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत घरपोच मोफत राईड योजना असल्याचा दावा असत्य ठरला. अशी कोणतीही सरकारची योजना नाही. मात्र, दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

SCROLL FOR NEXT