Fact Check : पायाने तुडवून तयार केली जाते आलं-लसूण पेस्ट? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पाहा व्हिडिओ

ginger garlic paste : पायाने तुडवून तयार केली जाते आलं-लसूण पेस्ट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य 'व्हायरल सत्य' टीमने शोधलं.
पायाने तुडवून तयार केली जाते आलं-लसूण पेस्ट? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पाहा व्हिडिओ
ginger garlic paste Saam tv
Published On

मुंबई : जमिनीवर सोलून ठेवलेले लसूण आहेत. एक व्यक्ती या लसणावर उभा राहून ते पायाने तुडवतोय. दुसरीकडे अशुद्ध पाण्यात आलं धुतलं जातंय.

जेवण चमचमीत लागावं म्हणून जी पेस्ट जेवणात टाकता ती ही आलं लसून पेस्ट आहे. हा किळसवाणा व्हिडिओ पाहून आलं लसूण पेस्ट जेवणात घालणंच सोडून द्याल, अशीच अशुद्ध आलं लसूण पेस्ट आपल्याला विकली जाते. मात्र, आपण ती जेवणात टाकून जेवण चवीचवीनं खातो. मात्र, हा व्हिडिओ आहे तरी कुठला? महाराष्ट्रातील हा व्हिडिओ आहे का? ही पेस्ट आपल्याला विकली जातेय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली.थेट आरोग्याशी संबंध असल्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने रिसर्च सुरू केला. त्याआधी हा व्हायरल व्हिडिओ निरखून पाहूया.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

सोललेलं लसूण जमिनीवर ठेवलंय. एक व्यक्ती या लसूणवर पाय देतो. आल्याचे तुकडे करून टबमध्ये ठेवलंय. एका टबमध्ये पाणी एका टबमध्ये आलं ठेवलंय. हेच डर्टी आलं लसूण वापरून पेस्ट केली जाते.

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकलीच असेल. मात्र, बाजारात अशा प्रकारे सगळ्याच पेस्ट नसतात. काही चांगल्या कंपन्या आहेत, त्या योग्य पद्धतीची पेस्ट विकतात. मात्र, काही कंपन्या आपल्या तुंबड्या भरण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळतात. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली असता हा व्हिडिओ हैदराबादमधील असल्याचं समोर आलं. तरीदेखील अशा पेस्टमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात हे डॉक्टरांकडून जाणून घेतलं.

पायाने तुडवून तयार केली जाते आलं-लसूण पेस्ट? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पाहा व्हिडिओ
Fact Check : गावागावात नदीत झुंडीने फिरून हल्ला करणाऱ्या मगरींची दहशत, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? VIDEO

व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही, हैदराबादचा आहे. अस्वच्छ पद्धतीनं तयार करण्यात आलेली पेस्ट आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा प्रकारची पेस्ट पोटात गेल्यास अपचन होऊन उलट्या होतात. जुलाब, उलट्या सुरू होऊन विषबाधा होते, पोटाचे विकार वाढतात. अशा पेस्टमधील टॉक्सिन छोट्या आतड्यात गेल्यास कायमस्वरूपी इजा होते. अशुद्ध पेस्टमुळे संसर्ग झाल्यास अवयव निकामी होऊ शकतात.

पायाने तुडवून तयार केली जाते आलं-लसूण पेस्ट? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पाहा व्हिडिओ
Fact Check News : आईस्क्रीम खाल तर हार्ट अटॅकनं जाल? व्हायरल मेसेजचं सत्य काय? पाहा व्हिडिओ

तुम्ही अशा प्रकारची डर्टी आलं लसूण पेस्ट किंवा इतर काही वस्तू खरेदी करत असाल तर आजारी पडू शकता. त्यामुळे शक्यतो अशा पेस्ट घरातच बनवणे हा उत्तम उपाय आहे. आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ हैद्रराबादमधील असल्याचं समोर आलं असून, अशी पेस्ट खाल्ल्याने गंभीर आजार होतात हा दावा सत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com