Garlic Rate High : १ लिटर पेट्रोलच्या किंमतीत मिळतोय फक्त पाव किलो लसूण; दर आणखी वाढण्याची शक्यता

Garlic Price Today : बाजारात सध्या लसूणचा भाव थेट ४०० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. पुढील काही महिन्यांत भाव आणखी वाढून थेट ६०० रुपयांपर्यंत पोहचू शकतो अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
Garlic Price Today
Garlic Rate HighSaam TV
Published On

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. बाजारात सध्या लसूणचा भाव थेट ४०० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. पुढील काही महिन्यांत भाव आणखी वाढून थेट ६०० रुपयांपर्यंत पोहचू शकतो अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Garlic Price Today
Garlic Mushroom Rice Recipe: अवघ्या काही मिनिटांमध्ये घरच्या घरा सोप्या पद्धतीनं बनवा गार्लिक मशरूम राइस

लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिक काटकसर करून आयुष्य जगत आहेत. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी एवढा महागडा लसूण विकत घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय.

यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा लसणाच्या दरांचा मोठा भडका उडाला होता. वाढलेला भाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा ऑगस्टमध्ये भाव वाढले आहेत. बाजारात सध्या लसूण ४०० रुपयांनी किरकोळ बाजारात विकला जातोय. तर होलसेलमध्ये हाच लसूण २०० ते ३२० रुपयांना मिळत आहे.

लसणाचे दर कमी केव्हा होणार?

लसूण महागल्यावर आता पुन्हा दर किती दिवसांपर्यंत कमी होतील असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत याहे. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये नवीन लसूणचे उत्पादन होते. त्यानंतर आवक फेब्युवारीपर्यंत सुरळीत होते. त्यामुळे या वर्षी तरी नागरिकांना महागडाच लसूण खावा लागणार असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून लसणाची आवक होत असते. भाव वाढत असल्याने सामान्य नागरिकांकडून यावर संताप व्यक्त केला जात आहे.

Garlic Price Today
Garlic Price Hike : लसूण महागला, गृहिणींचं बजेट कोलमडलं (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com