Garlic Price Hike: आवक कमी झाल्याने लसणाचे दर पुन्हा ३०० पार

Garlic Rate Increased: रोजच्या आहारात वापरण्यासाठी येणाऱ्या लसूण तीनशे रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे गृहिणींचे गणित कोलमडले आहे
Garlic Price Hike: आवक कमी झाल्याने लसणाचे दर पुन्हा ३०० पार
Garlic PricesSaam TV
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील काही महिन्यांपूर्वी लसूणच्या दरात मोठी वाढ होऊन ४०० रुपयांच्या वर गेले होते. मात्र मध्यंतरी आवक वाढल्यानंतर दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा लसूणाची आवक कमी झाल्याने दर वधारले असून प्रतिकिलो ३०० रुपये इतके लसूणचे दर झाले आहेत.  

Garlic Price Hike: आवक कमी झाल्याने लसणाचे दर पुन्हा ३०० पार
Marathwada Earthquake : मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले? जाणून घ्या सविस्तर...

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात लसणाची आवक आणखी कमी झाल्याने लसुनचे भाव तीनशे रुपये किलो पोहोचले आहेत. रोजच्या आहारात वापरण्यासाठी येणाऱ्या लसूण तीनशे रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे गृहिणींचे गणित कोलमडले आहे. मागच्या महिन्यात दोनशे रुपये किलोने लसुनची विक्री होत होती. मात्र लसुनची (Garlic) आवक कमी झाल्याने आता तीनशे रुपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे स्वयंपाकातील रोजच्या वापरात असलेल्या लसणाची फोडणी आता कमी होणार आहे. 

Garlic Price Hike: आवक कमी झाल्याने लसणाचे दर पुन्हा ३०० पार
Pik Vima News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाखांवर शेतकऱ्यांची विमा भरपाई कंपनीने नाकारली; निम्मे शेतकरी वंचित

आणखी दर वाढण्याची शक्यता 

सध्या लसणाचे दर वाढले असून येणाऱ्या काळात लसुनचे दर आणखीन वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसात लसणाची आवक हवी तशी होत नसल्याने भाव वाढण्याची शक्यता आहे. या शिवाय भाजीपाल्याचे भाव देखील शंभर पेक्षा अधिक झाले आहेत. त्यातच लसूणच्या दर तीनशे रुपये किलो गेल्याने सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठा आर्थिक अडथळा निर्माण झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com