रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने विविध कारणे देत जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील केवळ २ लाख २९ हजार शेतकऱ्यांनाच पिक विमा मंजूर झाला असून 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी अद्यापही यापासून वंचित आहे.
राज्यातील (Farmer) शेतकऱ्यांना १ रुपयात पिक विमा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. यानंतर गतवर्षी खरीप हंगामात छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार ६४४ शेतकऱ्यांनी ५ लाख ५४ हजार ६७५ हेक्टरवर विविध पिकांचा विमा उतरविला होता. आणि त्याच वेळी जिल्ह्यातील २० कृषी मंडळात सुमारे ३०० गावांमध्ये वीस दिवसापेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने विमा कंपनीने ९२ कोटी रुपये वाटप केले होते.
दरम्यान दावे फेटाळून लावल्यानंतर शेतकऱ्यांनी (Crop Insurance) पीक विमा कंपनीच्या विरोधात प्रचंड आरडाओरड सुरू केली. त्यानंतर कृषी विभागाने कंपनीला फैलावर घेतलं आणि कारणे देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कंपनीने सारवासारव करत १ लाख १४ हजार ६४३ शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला. दरम्यान साम टीव्ही ने बातमी लावून धरल्यानंतर १ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना विमा मंजूर केला होता. आतापर्यंत कंपनीने ३ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना विमा मंजूर केला. तरीही ३ लाखांपेक्षा अधिक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.