How much raw garlic should you eat a day?
Raw Garlic Eating BenefitsSaam TV

Raw Garlic Eating Benefits : दुपारचे जेवण करण्याआधी 'खा' लसूण; आरोग्याशी संबंधित अनेक आजारा होतील छूमंतर

How much raw garlic should you eat a day? : जेवणात भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये असलेला लसूण अनेक व्यक्ती बाजूला निवडून ठेवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लसूण खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
Published on

आपल्या किचनमध्ये खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत, मात्र त्याने आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो. आरोग्यासाठी लसूण फार फायदेशीर असतो. लसूण खाल्ल्याने विविध आजार दूर होतात. मात्र अनेक व्यक्ती लसूण खात नाहीत. जेवणात भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये असलेला लसूण अनेक व्यक्ती बाजूला निवडून ठेवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लसूण खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

How much raw garlic should you eat a day?
Garlic Benefits: सकाळी 2 पाकळ्या लसूण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित असायलाच हवे

लसूणमध्ये एलिसिन नावाचं एक सल्फर कंपाउंड असतं. लसूण एक प्रकारचे फाइटोकेमिकल सुद्धा आहे. यामुळे विविध आजारांपासून आपला बचाव होतो. याने जळजळ आणि अॅसिडीटी सारख्या समस्या सुद्धा दूर करता येतात. लसूण आरोग्यातील विविध गोष्टींसह त्वचेच्या समस्यांवर सुद्धा काम करते.

लसूण म्हणजे आरोग्यासाठी अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-परजीवी आणि अँटी-फंगल, अँटी-मोल्ड असे देखील म्हटले जाते.

लसूण आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. लसूण खाल्याने आपले शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आधीपेक्षा आणखी चांगली होते.

ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला होतो त्यांनी लसूणचे सूप प्यायले पाहिजे. तुम्हाला फक्त लसूणचे सूप आवडत नसेल तर विविध भाज्यांमध्ये फक्त लसूण फोडणी देऊन सुद्धा तुम्ही हे सूप पिऊ शकता.

काही व्यक्तींना जास्तप्रमाणात बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या असते. याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो. त्यामुळे तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रोजच्या आहारात लसूणच्या ३ पाकळ्या तरी खाण्यास सुरुवात करा.

ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी देखील आहारात लसूण खाण्यास सुरुवात केली पाहिजे. काही व्यक्तींना जेवण केल्यानंतर अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. अशा व्यक्तींनी जेवणाच्या १५ मिनिटे आधी कच्च्या लसणाच्या ४ ते ५ पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत.

तुम्ही लसूण विविध भाज्या, चटणी, कोशिंबीर किंवा सूप या विविध पदार्थांमधून याचे सेवन करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

How much raw garlic should you eat a day?
Garlic Allicin For Hair : 'ही' छोटीशी पाकळी खाताच केसांचं सौंदर्य १०० पटीने वाढेल; डँड्रफसह अनेक समस्या होतील गायब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com