Garlic Allicin For Hair : 'ही' छोटीशी पाकळी खाताच केसांचं सौंदर्य १०० पटीने वाढेल; डँड्रफसह अनेक समस्या होतील गायब

Remedies For Hair Growth : केस गळत असल्याने काही काळाने टक्कल वाढत जातं. तरुणांमध्ये देखील टक्कल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं कारण म्हणजे पोषण आहारावर व्यवस्थित लक्ष नसणे.
Remedies For Hair Growth
Garlic Allicin For Hair Saam TV
Published On

केसांच्या समस्या मुलींसह मुलांना देखील आहेत. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत असतात. काहींना केस पांढरे होणे, तर काहींना जास्त प्रमाणात गेस गळण्याच्या समस्या असतात. केस गळत असल्याने काही काळाने टक्कल वाढत जातं. तरुणांमध्ये देखील टक्कल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं कारण म्हणजे पोषण आहारावर व्यवस्थित लक्ष नसणे.

Remedies For Hair Growth
Hair Growth Smoothie : सततच्या केस गळतीमुळे वैतागले आहात? बायोटिन स्मूदी ठरेल फायदेशीर

केसांच्या विविध समस्यांवर तुम्ही आजवर अनेक उपाय केले असतील. मात्र कितीही उपाय करून सुद्धा काहींना त्याचा फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी केसांच्या विविध समस्यांवर रामबाण असलेली एक पाकळी शोधली आहे. या पाकळीच्या सहाय्याने तुमच्या केसांच्या अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतील. ही पाकळी शोधण्यासाठी तुम्हाला जास्त लांब जाण्याची गरज नाही अगदी तुमच्या किचनमध्येच तुम्हाला ही वस्तू सहज मिळेल.

केसांच्या समस्येवर उपयोगी लसूण

लसूण आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. छोटासा लसूण आपल्या आरोग्याशी संबंधीत अनेक आजारांवर काम करतो. यामुळे केसांचं सौंदर्य सुद्धा आणखी फुलून येतं. केसांच्या अनेक समस्यांवर लसूण जडिबुटीप्रमाणे काम करते.

लसूणच्या पाकळ्यांमध्ये एलिसिन असतं. आपल्या केसांची मुळं घट्ट राहण्यासाठी एलिसिन काम करते. लसुणचं सेवन केल्याने आपल्या डोक्याच्या स्कॅल्पमध्ये व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होतं. तु्म्ही केसांच्या विविध समस्येने वैतागले असाल तर आज लसूण वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.

पाणी आणि लसूण

केसांना सुंदर बनवण्यासाठी रामबाण औषध बनवताना सर्वात आधी एक १००ml पाणी बसेल एवढी स्प्रे बॉटल घ्या. यामध्ये पाणी टाका आणि त्यात एक लसूणची कळी ठेवून द्या. लसूणची पाकळी जशीच्या तशी पाण्यात टाकू नका. ती आधी खलबत्त्यात थोटी ठेचून घ्या आणि मग पाण्याच्या बॉटलमध्ये भरून ठेवा.

पुढे २ ते ३ दिवस ही पाण्याची बॉटल उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. त्यानंतर घरातच एखाद्या उबदार ठिकाणी ही बॉटल ठेवा. त्यानंतर २ दिवसांनी हे पाणी गाळून दुसर्‍या एका बॉटलमध्ये ठेवा. दिवसातून २ वेळा या पाण्याने स्पॅल्प मसाज करा.

लसूणचे पाणी केसांवर कसे वापरायचे?

तुम्ही केस धुणार असाल तेव्हा अंघोळीला जाण्याआधी केसांवर हे पाणी लावून घ्या. स्प्रेच्या मदतीने तुम्ही स्कॅल्पवर हे पाणी अप्लाय करू शकता. केस सर्वाधिक मध्य भागी आणि मागच्या बाजून गळतात. त्यामुळे या भागावर तुम्ही लसूणचे पाणी फवारा. केसांवर हे पाणी अप्लाय करत असताना तुम्हाला लसूणचा स्मेल जास्त येत असेल तर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करा.

Remedies For Hair Growth
Hair Growth : केस इतके लांबलचक होतील की, महिन्यातून २ वेळा करावा लागेल हेअर कट; घरीच बनवा रामबाण तेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com