Curd Benefits For Hair : केसांच्या विविध समस्यांसाठी वरदान ठरेल दही; फक्त वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Beauty Tips : समस्यांपासून सुटका मिळावी यासाठी महिला तसेच पुरुष मंडळी केसांवर विविध शॅम्पू अप्लाय करतात. मात्र त्याने केस आणखी डॅमेज होतात. त्यामुळे आज केस गळती, कोंडा आणि विविध समस्यांवर दह्याचा रामबाण उपाय जाणून घेऊ.
Beauty Tips
Curd Benefits For HairSaam TV

उन्हाळ्यात वातावरणात जास्त उष्णता असल्याने याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. केसांशी संबंधित समस्या उन्हाळ्यात आणखी जास्त वाढतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळावी यासाठी महिला तसेच पुरुष मंडळी केसांवर विविध शॅम्पू अप्लाय करतात. मात्र त्याने केस आणखी डॅमेज होतात. त्यामुळे आज केस गळती, कोंडा आणि विविध समस्यांवर दह्याचा रामबाण उपाय जाणून घेऊ.

Beauty Tips
Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण आहे एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

कोंडा असल्यास उपाय

उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो. त्यामुळे केसांत कोंडा जास्तप्रमाणात होतो.

केसांत कोंडा झाल्याने केसांत सतत खाज येते आणि चिडचिड वाढते.

केसांतील कोंडा जावा यासाठी दह्यामध्ये आर्धा लिंबू पिळून घ्या.

लिंबू पिळल्यानंतर दही छान फेटून घ्या.

त्यानंतर हे मिश्रण केसांवर अप्लाय करा.

१ तासाने केस कोमट पाण्याने धुवून घ्या.

केस गळत असल्यास

केस गळत असल्यास एका बाउलमध्ये फ्रेश दही घ्या.

त्यानंतर कडीपत्त्याच्या पानांचा मिक्सरला बारीक चुरा करून घ्या.

हे मिश्रण केसांवर अप्लाय करा.

तुम्ही मेहंदी लावता त्याप्रमाणे स्कॅल्पसह केसांवर दही लावा.

२ तासांनी केस धुवून घ्या.

ड्राय केसांसाठी उपाय

विविध प्रकारचे तेल लावून देखील तुमचे केस ड्राय असतील तर यावर दही उपाय आहे.

आधी केस तुम्ही जो शॅम्पू वापरता त्याने धुवून घ्या.

त्यानंतर केसांची एक एक बट घेऊन त्यावर साधं दही लावा.

१५ ते २० मिनिटे दही तसंच ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.

केसांच्या वाढीसाठी

केस वाढावेत यासाठी दह्यामध्ये नारळाचं तेल मिक्स करा.

त्यासह यामध्ये जास्वंदाची फुलं देखील मिक्स करा.

तसेच कडीपत्ता आणि काही मेथीदाणे अॅड करा.

या सर्वांची बारीक पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या स्कॅल्पवर अप्लाय करा.

टीप : सुंदर केसांसाठी आणि केसांच्या विविध समस्यांवर दिलेली ही एक सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचं समर्थन करत नाही.

Beauty Tips
Hair Care tips: रात्री केस विंचरुन झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com