Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण आहे एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Hair Mask For Reduces Hair Fall: सध्या वातावरणात अनेक बदल होत आहे. प्रदुषणाचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर केसांवरदेखील होतो. या प्रदुषणामुळे अनेकांना केस गळती, पातळ केस असणे अशा समस्या झाल्या आहेत.
Hair Fall Problem
Hair Fall ProblemSaam Tv
Published On

सध्या वातावरणात अनेक बदल होत आहे. घराबाहेर उन्हाळ्याच्या झळा बसत आहे. त्याचसोबत धूळ आणि प्रदुषणामुळे शरीराला खूप त्रास होतो. प्रदुषणाचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर केसांवरदेखील होतो. या प्रदुषणामुळे अनेकांना केस गळती, पातळ केस असणे अशा समस्या झाल्या आहेत. केस सुंदर असतील तर त्याचा परिणाम आपल्या दिसण्यावर, व्यक्तीमत्त्वावर होतो. त्यामुळे केसांच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही हेअर मास्क वापरु शकता. हे हेअर मास्क तुम्हाला केस गळतीपासून दूर ठेवतील.

1. एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑइल आणि मोहरीचे तेल

एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑइल आणि मोहरीचे तेल केसांना लावल्याचे अनेक फायदे आहेत. याचा हेअर मास्क बनवण्यासाठी २ चमचे एरंडेल तेल, १ चमचा ऑलिव्ह ऑइल आणि १ चमचा मोहरीचे तेल घ्या. एका भांड्यात हे तिन्ही तेल एकत्र मिसळा. हा हेअर मास्क तुमच्या केसांच्या मूळापर्यंत लावा. २ ते ३ तास केसांना हा हेअर मास्क लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हे तेल लावल्याने केस गळतीपासून तुमची सुटका होईल.

Hair Fall Problem
International Dance Day 2024: भारतातच नव्हे तर जगभरातही प्रसिद्ध आहेत हे शास्त्रीय नृत्य; जाणून घ्या

2. एरंडेल तेल, मध आणि अंडी

हा हेअर मास्क बनवण्यासाठी २ चमचे एरंडेल तेल, १ चमचा मध आणि अंडी लागतील. सर्वप्रथम एका भांड्यात अंड चांगले फेटून घ्या. त्यात एरंडेल तेल आणि मध टाका. हे मिश्रण केसांना लावा. यानंतर शॉवर कॅपने केस झाकून घ्या. केसांवर १ तास हा हेअर मास्त ठेवावा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाकावे.

Hair Fall Problem
Car Fire Safety Tips: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com