कोमल दामुद्रे
शारीरिक मानसिक आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांची समस्या दूर करण्यासाठीही योगासनं फायद्याची ठरतात
तुम्ही केस गळतीच्या समस्येनं त्रासला असाल तर आज आम्ही तुम्हाला केसांचं गळणं थांबवण्यासाठी प्रभावी ठरणारी काही योगासनं सांगणार आहोत.
ही योगासनं केसांच्या वाढीसाठी तुमची मदत करू शकतात.
दररोज ६ ते १२ मिनिटे कपालभातीचा सराव करावा. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
यामुळे, स्कॅल्पपर्यंत पोहोचणार्या ऑक्सिजनमध्ये वाढ होते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
हे आसन तुमच्या डोक्यात रक्त परिसंचरण वाढवते. रोज या योगा प्रकाराचा सराव केल्याने आपल्या डोक्यावर दीर्घकाळ प्रभाव राहतो आणि केस गळणं थांबतं.
रोजच्या या योगा प्रकाराचा सराव केल्याने आपली पचनसंस्था आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे केस गळतीचे धोका कमी होतो.
यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे केस गळणे आणि टक्कल पडणे कमी होते. हे आसन केसांच्या नवीन वाढीस मदत करते आणि केस गळती थांबते.