Car Fire Safety Tips: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

Why Car Catches Fire and How To Care Car: रस्त्यावर धावणाऱ्या कार, इतर वाहने का पेट घेतल्याच्या घटना काही दिवसात घडल्याचं आपणं पाहिलं असेल. धावत्या कार आगीच्या भक्ष्यस्थानी का येत आहेत. वाहनांना आग लागण्याच्या घटना का घडत आहेत, हे जाणून घेऊ ..
Reason Behind Car Catches Fire
Reason Behind Car Catches Fireyandex

उन्हाळा सुरू झाल्याने देशाच्या विविध भागात कारला आग लागण्याच्या घटनाही घडल्यात. कुठे अपघात होऊन वाहनांनी पेट घेतला, तर कुठे रस्त्यावरून धावणाऱ्या कार अचानक आग लागल्याच्या घटना घडल्यात. काल पर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली होती. जवळपास ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटन मुंबई-पुणे महामार्गावर घडली होती. बसला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने बसमधील प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला होता. रस्त्यावर धावणारे वाहने अचानक पेट का घेत आहेत, हे जाणून घेऊ.

Reason Behind Car Catches Fire
Kasara Ghat Fire News: जुना कसारा घाटात धावत्या कारने घेतला पेट; जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची धावपळ

वाहनाला आग का लागते?

कारला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट किंवा काही प्रकारचा बिघाड झाला तर वाहनांना आग लागते. पण याशिवाय आणखी काही कारणांमुळे आग लागण्याचा धोका असतो. जुन्या वाहनांमध्ये वायरिंग आणि बॅटरीतील बिघाडांमुळे आग लागल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे अपघात झाल्यास आगीचा धोका वाढत असतो.

यासह काही प्रकरणात असेही आढळून आले की, लांब पल्ल्याचा प्रवास केला तर वाहनांचे टायर तापत असतात. टायर आणि रस्त्याचं घर्षण होत असते त्यामुळे वाहने पेट घेतल्याचं आढळून आले. अशा घटना बहुधा एक्स्प्रेस वेवर घडल्यात. द्रुतगती मार्गांच्या बांधकामात काँक्रीट किंवा सिमेंटचा वापर केला जातो. तर डांबरी रस्त्यांमध्ये बिटुमनचा वापर केला जातो. दरम्यान काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टायरचे घर्षण होत असते.

जास्त घर्षण झाल्यामुळे जास्त उष्णता निर्माण होत असते, ज्यामुळे टायरची रचना वेगाने खराब होते. यामुळे टायर फुटण्याची शक्यता वाढत असते. चालत्या कारचा टायर रस्त्याच्या थेट संपर्कात असतो आणि घर्षणामुळे टायरचे तापमान लक्षणीय वाढत असते. कधीकधी टायरचा जळल्याचा वास येऊ लागतो. याची वेळीच काळजी न घेतल्यास वाहने पेट घेत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com