International Dance Day 2024: भारतातच नव्हे तर जगभरातही प्रसिद्ध आहेत हे शास्त्रीय नृत्य; जाणून घ्या

Indian Classical Dance:जगभरात २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य ही एक सुंदर कला आहे. काहीजण डान्स हे आपलं करिअर म्हणून निवडतात.
International Dance Day 2024
International Dance Day 2024Saam Tv

दरवर्षी जगभरात २९ एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. नृत्य ही एक सुंदर कला आहे. नृत्य करणे हे अनेकांना आवडते. काहीजण डान्स हे आपलं करिअरचे क्षेत्र म्हणून निवडतात. नृत्य हे फक्त मनोरंजनाचे साधन नव्हे तर एक कला आहे. अनेक गोष्टी नृत्याच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहचवल्या जातात. भारतातील अनेक पारंपारिक नृत्य जगभरात प्रसिद्ध आहेत. या नृत्यप्रकाराची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कथ्थक (Kathak)

कथ्थक हा एक शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे. यामध्ये तुमचे चेहऱ्यावरील हावभाव, हाताचे हावभाव आणि ताल हे खूप महत्त्वाचे असतात. या नृत्याच्या साहाय्याने काहीतरी कथा सांगितली जाते. महाभारतातही कथ्थक या नृत्याचा उल्लेख आहे.

भरतनाट्यम (Bharatnatyam)

भारतातील भरतनाट्यम हे प्रसिद्ध शास्त्रिय नृत्य आहे. तमिळनाडूमध्ये हा नृत्यप्रकार सर्वात आधी केला जायचा, असे म्हटले जाते. तमिळनाडूच्या देवदासींनी हे नृत्य विकसित केले असल्याचे मानले जाते. हा नृत्यप्रकार भरतमुनींच्या नाट्यशास्त्राने प्रेरित आहे. हा नृत्य खूप लोकप्रिय आहे.

International Dance Day 2024
Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

मोहिनीअट्टम (MohiniAttam)

मोहिनीअट्टम हा लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. हे नृत्य ताल, मुद्रा आणि संगीताच्या माध्यमातून सादर केले जाते. ही नृत्यकला भगवान विष्णूंच्या मोहिनी अवतारापासून प्रेरित आहे. भगवान विष्णूने मोहिनीच्या रुपात भस्मासुराचा वध केला होता. तेव्हापासून हा नृत्यप्रकार केला जातो.

कुचीपुडी (Kuchipudi)

कुचीपुडी ही आंध्र प्रदेशमधील नृत्यशैली आहे. पूर्वी फक्त पुरुष हे नृत्य मंदिरात करायचे परंतु आता महिलादेखील या नृत्याचा भाग झाल्या आहेत. यामध्ये नर्तक दुःख, आनंद, प्रेम, राग या सर्व गोष्टी चित्रित करतात.

International Dance Day 2024
Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतात गंभीर आजार, शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com