Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा १३ वर; एका चुकीमुळे घडली मोठी दुर्घटना

Andhra Pradesh News: या अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
Andhra Pradesh Train Accident
Andhra Pradesh Train AccidentSaam Tv
Published On

Andhra Pradesh Train Accident Update:

आंध्र प्रदेशमध्ये रविवारी भीषण रेल्वे अपघात (Andhra Pradesh Train Accident) झाला. दोन ट्रेनची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०४ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल या दोन ट्रेनची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही ट्रेनचे आणि रूळाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ट्रेनच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या मार्गावर हा रेल्वे अपघात झाला तो हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो.

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विजियानगरम जिल्ह्यातील कंटकपल्ले येथे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला धडक दिली. त्यामुळे या ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरले. अपघातामागे मानवी चूक असल्याचे सांगण्यात येत आहे. विजियानगरम जिल्ह्याचे एसपींनी सांगितले की, या रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत.

Andhra Pradesh Train Accident
Maratha Reservation Breaking : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात; सूत्रांची माहिती

भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा रेल्वे अपघात अलमांडा आणि कंटकपल्ली रेल्वे स्थानकादरम्यान झाला. अपघातामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधारात झाला होता. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या या रेल्वे अपघातानंतर रेल्वेने १३ गाड्या रद्द केल्या. तर काहींच्या मार्गामध्ये बदल केला. या अपघातामुळे ट्रॅक ब्लॉक झाला. ज्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून ट्रेन धावू शकत नाही.

रेल्वे अपघातातील मृतांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री रेड्डी यांनीही पीडितांना भरपाई जाहीर केली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तर इतर राज्यात मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले. तसंच, पंतप्रधान मोदींनी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

Andhra Pradesh Train Accident
Onion Prices Increased : कांद्याचे दर लवकरच १५० रुपयांपर्यंत जाणार? दरवाढीचं नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com