कांद्याच्या वाढत्या दराने सर्वसामान्य जनतेचं घराचं बजेट कोलमडत आहे. टोमॅटोचे दर काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडले होते. आता कांदाही त्याच मार्गावर आहे. कांद्याचे दर दुप्पट झाले आहे. राज्यात काही ठिकाणी कांद्याची दर 80 ते 100 रुपयांवर पोहोचले आहेत.
कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांद्याचे भाव आणखी काही दिवस उच्च पातळीवर राहतील आणि ते 100 रुपयांच्या पुढे जाऊन 150 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.
कांद्याची आवक घडल्याने आणि पुरवठा कमी होत असल्याने भाव झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळेच किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 30 ते 35 रुपये किलोवरून थेट 75 ते 80 रुपये किलो झाला आहे. अवघ्या आठवडाभरात या किमती वाढल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकारने काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर शुल्क जाहीर करण्यात आले. आता डिसेंबरपर्यंत कांद्याचा निर्यात दर ६० रुपये प्रति किलो असेल, जो पूर्वी 40 रुपये किलो होता. निर्यात शुल्क वाढवल्याने अधिकाधिक कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पोहोचेल, ज्यामुळे भाव कमी होऊ शकतात. (Latest Marathi News)
सध्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. सध्या जो कांदा उपलब्ध आहे तो शेवटचा साठा आहे. त्यामुळे पुरवठा झपाट्याने कमी होत आहे. स्थानिक बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा कमी झाल्याने कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मात्र सरकारकडून वेळेत पावलं उचलली गेली नाही तर कांद्याचे दर 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतात.
केंद्राच्या कांदा निर्यात शुल्का विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्यावरील 800 डॉलर निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतांना केंद्राचा कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.