Winter Season Weather : आला थंडीचा महिना, झटपट...! महाराष्ट्र गारेगार, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

Cold Weather News: हिवाळ्याच्या आगमनाने गोंदिया कूल झाला आहे. गेल्या २ दिवसांत पुण्यातील पारा ३ ते ४ अंश सेल्सिअसने कमी झालाय.
Cold Weather
Cold WeatherSaam TV
Published On

Weather Update Maharashtra:

राज्यात अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात तापमाणात मोठी घट होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे कोकणसह विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडी जास्त प्रमाणात जाणवू लागली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cold Weather
Pune Cold Fever Patients Increases: डोळ्यांनंतर पुण्यात थंडी-तापाची साथ; दिवसाला ३५० हून अधिक रुग्णांची नोंद

गोंदिया जिल्ह्याचा पारा 16.2 अंशावर आला असून सकाळी आणि सायंकाळी थंडीचा जोर वाढला आहे. यामुळे गरम कपड्यांची दुकाने सजलेली दिसतायत. हिवाळ्याच्या आगमनाने गोंदिया कूल झाला आहे. तर गोंदियाकर गूलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

पुण्यातील तापमानातही घट झालीये. त्यामुळे पुणेकर गुलाबी थंडी अनुभवतायत. गेल्या २ दिवसांत पुण्यातील पारा ३ ते ४ अंश सेल्सिअसने कमी झालाय. थंडी पुढील ४ ते ५ दिवस कायम राहणार असून तापमानात आणखी घट होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

परभणी जिल्हातही किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. काही प्रमाणात बोचरी थंडी जाणविण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये काल किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याची माहिती वनामकृवि कृषी मौसम सेवा केंद्राने दिलीये.

दरम्यान, जिल्ह्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने आणखी घट होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर येथे किमान तापमानात घट झालीये. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि विदर्भात अकोला, नांदेड, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ बीड, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे किमान तापमानात घट झाली आहे.

Cold Weather
IND vs ENG, Weather Report: भारत- इंग्लंड सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? जाणून घ्या खेळ होणार की खेळखंडोबा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com