IND vs ENG, Weather Report: भारत- इंग्लंड सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? जाणून घ्या खेळ होणार की खेळखंडोबा...

India vs England, Weather Prediction: जाणून घ्या या सामन्यावेळी कसं असेल हवामान
IND vs ENG, Weather Report
IND vs ENG, Weather ReportSaam tv news
Published On

India vs England, Weather Prediction:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५ पैकी ५ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेला भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हे दोन्ही संघ लखनऊच्या मैदानावर आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यावेळी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

लखनऊच्या मैदानावर झालेल्या सामन्यांपैकी एकाही सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पावसाचा व्यत्यत न येता ५०-५० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

रविवारी सामन्यावेळी तापमान ३१ डिग्री सेल्सियस इतकं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर संध्याकाळच्या वेळी तापमान २५ डिग्री सेल्सियस इतकं असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल मात्र पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ ५ टक्के इतकी असणार आहे. (Latest sports updates)

IND vs ENG, Weather Report
Ind v Pak, Playing XI : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात! KL Rahul च्या जागी कोण?

हार्दिक पंड्या खेळणार का?

भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गेल्या सामन्यात खेळताना दिसून आलेला नाही. इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही तो खेळताना दिसून येणार नाही. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.

त्यामुळे या सामन्यासाठी आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ५ गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो. त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IND vs ENG, Weather Report
Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन ,सूर्यकुमार यादव.

असा आहे इंग्लंडचा संघ:

जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जो रूट, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोइन अली, ख्रिस वोक्स, सॅम करण, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टॉपले, गस एटकिंसन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com