Ind v Pak, Playing XI : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात! KL Rahul च्या जागी कोण?

Asia Cup 2023 India vs Pakistan Playing 11: पाहा कशी असेल भारतीय संघााची प्लेइंग ११.
Asia Cup 2023 India vs Pakistan Playing 11
Asia Cup 2023 India vs Pakistan Playing 11Saam tv
Published On

Team India Playing 11 For Match Against Pakistan:

पाकिस्तान विरुद्ध नेपाळच्या सामन्याने आशिया चषक २०२३ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत स्पर्धेतील २ सामने खेळले गेले आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती , भारत - पाकिस्तान सामन्याची.

दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. दरम्यान जाणून घ्या नंबर १ पाकिस्तानला हरवण्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११.

Asia Cup 2023 India vs Pakistan Playing 11
Most Runs In Asia Cup: आशिया चषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

केएल राहुल दुखापतग्रस्त..

आशिया चषक सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे सुरुवातीचे २ सामने खेळू शकणार नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबत माहिती दिली आहे.

तो पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यातून बाहेर असणार आहे. जर केएल राहुल बाहेर आहे तर त्याच्याऐवजी ईशान किशनचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो. मात्र तो कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे अजूनही स्पष्ट नाही.

नुकताच वेस्टइंडीज संघाविरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेत ईशान किशनच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली होती. या मालिकेत सलामीला येत त्याने ३ अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे आशिया चषकातही ईशान सलामीला येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच विराट कितव्या क्रमांकावर खेळणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)

Asia Cup 2023 India vs Pakistan Playing 11
Asia Cup Records: आशिया चषकात सर्वाधिक रन्स अन् विकेट्स कोणी घेतल्या? पाहा स्पर्धेतील रेकॉर्ड्स

पाकिस्तानला हरवण्यासाठी भारतीय संघाने मजबूत गोलंदाजी आक्रमणासह मैदानात उतरणं खूप गरजेचं असणार आहे. या संघात २ फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाजांचा समावेश असू शकतो.

वेगवान गोलंदाज म्हणून संघात मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि दमदार कमबॅक केलेला जसप्रीत बुमराहला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवचा समावेश केला जाऊ शकतो.

अशी असू शकते प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार ),शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com