Pune Cold Fever Patients Increases: डोळ्यांनंतर पुण्यात थंडी-तापाची साथ; दिवसाला ३५० हून अधिक रुग्णांची नोंद

Pune Health News: शहरात दिवसाला ३०० ते ४०० रुग्णांची नोंद होत आहे.
Cold Fever Patients Increases
Cold Fever Patients IncreasesSaam TV
Published On

Pune News:

राज्यात अनेक ठिकाणी सध्या डोळ्यांची साथ आल्याचं दिसत आहे. अशात सर्दी-खोकल्याच्या साथीने देखील डोकं वर काढलंय. थंडीतापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात सतत हवामान बदलत आहे. मध्येच कडाक्याचे ऊन तर मध्येच मुसळधार पाऊस बरसतोय. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. (Latest Marathi News)

बदलत्या वातावरणाचा परिणामाने पुण्यात थंडी तापाचे रुग्ण वाढले आहेत. पावसाच्या अधून मधून पडणाऱ्या सरी, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा चटका यामुळे ताप, खोकला, सर्दी, डोके दुखी, थंडी वाजणे अशा समस्यांचा पुणेकरांना सामना करावा लागत आहे. शहरात दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण या व्याधींनी त्रस्त झाल्याचे दिसत आहे.

Cold Fever Patients Increases
Winter Health Tips : हिवाळ्यातली शेकोटी आरोग्याला पडेल भारी, असे होते शरीराला नुकसान!

यामध्ये लहान मुलांसह १५ ते २४ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. पुणे शहरात या महिन्यात डेंग्यूचे २२८ संशयित रुग्ण तर चिकनगुनियाचे २८० संशयित रुग्ण आढळले आहेत. अशा आजारांमध्ये लहान मुलांच्या जिवाला सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे लसिकरण करणे आवश्यक आहे.

सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी अशी घ्या काळजी

आजारी असताना मुलाला शाळेत पाठवू नका.

भरपूर प्रमाणात पाणी पाजा.

आहारात ताजे पदार्थच द्या.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे देऊ नका.

लहान मुलांना फ्लू प्रतिबंधक लस द्या.

Cold Fever Patients Increases
Travel Tips For Diabetes Patients : प्रवास करताना मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करु नका 'या' चुका, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com