Winter Health Tips : हिवाळ्यातली शेकोटी आरोग्याला पडेल भारी, असे होते शरीराला नुकसान!

Health Tips : हिवाळ्यात तापमान खाली जाऊन थंडी खूप वाढते त्यामुळे आपण शेकोटी पेटवून तासान तास आग शेकत बसतो.
Winter Health Tips
Winter Health TipsSaam Tv

Health At Fireplace : हिवाळ्यात तापमान खाली जाऊन थंडी खूप वाढते त्यामुळे आपण शेकोटी पेटवून तासान तास आग शेकत बसतो. लोक सकाळ-संध्याकाळच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून खूप वेळ गप्पा मारत आगी समोर बसतात. जर तुम्ही असे करत असाल तर वेळीच सावधान झालेले बरे.

ही सवय नकळत तुमचा आरोग्याला (Health) धोका पोहोचवत आहे. शेकोटी पेटवण्यासाठी बरेच लोक कोळसा पेटवून त्यावरती शेकताना दिसतात, परंतु असे केल्याने तुमच्या त्वचेचे (Skin) नुकसान होऊ शकते. सोबतच अशक्तपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागेल तसेच आरोग्याला आणखीन काही नुकसान होते त्याविषयी माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

Winter Health Tips
Health Tips : बाजरी आणि ज्वारीची भाकरी का आरोग्यासाठी उत्तम?

ॲनिमिया -

जास्ती वेळ बंद खोलीत शेकोटी पेटवल्याने कार्बन मोनॉक्साईड निर्माण होते आणि ते श्वसनाद्वारे फुफ्फुसात पोहोचल्याने थेट रक्ताच्या संपर्कात येतात त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत जाते परिणामी ॲनिमिया होण्याची शक्यता वाढते.

डोकेदुखीच्या समस्या -

आग तापवल्याने धूर होतो आणि त्या धुरासोबत कार्बन बाहेर पडते. ते श्वसनातून शरीरात जाते त्यामुळे हिमोग्लोबनच्या रेणूवर परिणाम होऊन ते अवरोधित होतात. त्याचा परिणाम संपूर्ण शरीराचे ऑक्सिजन वाहतूक प्रणालीवर होतो. शरीरातील ऑक्सीजन कमी झाल्याने शरीरातील पेशी मरायला लागतात. त्यामुळे अशावेळी बऱ्याच लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Winter Health Tips
Health Tips : व्हायरल फिव्हरचा जास्त ताण; ठरु शकते मृत्यूचे कारण

त्वचेच्या समस्या -

जास्त वेळ आगी समोर बसल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात.त्वचेत कोरडेपणा येतो. आगीतील उष्णतेमुळे त्वचेतील ओलावा शोषण घेण्यास सुरू करते त्यामुळे त्वचेत कोरडेपणा येऊ शकते.

ऑक्सिजनची पातळी कमी -

एखाद्या बंद खोलीत लाकूड आणि कोळशाने शेकोटी पेटवल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. बंद खोलित मोनॉक्साईड पातळी वाढण्याची शक्यता अधिक असते त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होतो.

श्वासोच्छवासाची समस्या -

आगी समोर जास्ती वेळ बसल्याने त्याचा परिणाम शोषण संस्थेवर होऊ शकतो.त्यामुळे पुढे चालून भविष्यात श्वसनाचे आजार उद्भवू शकतात तसेच जास्त वेळ आगी समोर बसल्याने व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागते त्यामुळे लोकांना श्वास घेण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com