दिवसभर थकल्यानंतरही अनेकांना शांतपणे झोप लागत नाही. अनेक व्यक्तींना रात्री झोपताना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बदलेल्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्याशी संबंध असल्याचे समजले जाते.
झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक गंभीर आजार (Disease) जडण्याची समस्या आहे. चांगल्या झोपेसाठी आपण चांगला आहार योग्य असायला हवा. आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोप पूर्ण करणे गरजेचे आहे. जर दिवसभर थकूनही तुम्हाला झोप येत नसेल तर कोणते गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात जाणून घ्या.
1. लठ्ठपणा
कमी झोपेमुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढते. वाढत्या वजनामुळे तुमचे शरीर अनेक गंभीर आजारांना बळी पडते.
3. हार्ट अटॅक
संशोधनातून असे कळाले की, दररोज दोन तास कमी झोप घेतल्याने हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. ज्यामुळे तुमचा बीपी वाढतो. हृदयावर दबाव येतो. अशा स्थितीत ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या खराब होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक येतो.
4. स्मरणशक्ती कमकुवत होणे
झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. कमी झोपेमुळे तणावाची पातळी वाढते. ज्यामुळे मेंदूला चालना मिळत नाही. यामुळे डिप्रेशन, नैराश्याचे आपण शिकार होतो.
5. चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहाराची योग्य काळजी घ्या. नेहमी फ्रेश अन्नपदार्थ खा.
चांगल्या झोपेसाठी बाहेरचे जंक फूड खाणे बंद करा. तळलेले पदार्थ खाणे शक्यतो कमी करा.
दिवसभरात ५ ते ६ लीटर पाणी प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. तसेच शरीर हायड्रेट राहिल.
चांगल्या झोपेसाठी नियमित व्यायाम करा. कॅफीनचे सेवन कमी प्रमाणात करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.