High Cholesterol मुळे तरुणांचा जीव धोक्यात? हे उपाय करुन पाहा, मिळेल आराम

How To Prevent High Cholesterol : सध्या तरुणांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे. बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. सतत जंकफूड खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
High Cholesterol, High Cholesterol Disease
High Cholesterol, High Cholesterol DiseaseSaam Tv

High Cholesterol Effect In Youngsters :

सध्या तरुणांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे. बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. सतत जंकफूड खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

मिळालेल्या माहितीनुसार अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात तरुणांच्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढते आहे. परंतु, याची कोणतीही लक्षणे जाणवत नाही. शरीरात जमा होणारे वाईट कोलेस्टेरॉल हळूहळू ब्लॉकेज निर्माण करते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो.

२०२१ मध्ये केलेल्या एका अमेरिकन संशोधनातून असे आढळून आले आहे की, मोठ्या संख्येने तरुणांना वाईट कोलेस्टेरॉल वाढण्याच्या समस्येने त्रास होत आहे. उच्च कोलेस्टेरॉलनंतर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक आणि ब्लॉकेज तयार होतात. त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जाणून घ्या यावर मात कशी करायची.

High Cholesterol, High Cholesterol Disease
Mint Water Benefits : उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचे पाणी, आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे

1. तपासणी करा

जर तुमचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमचे कोलेस्टरॉल तपासायला हवे. दर पाच वर्षांनी आरोग्याची (Health) तपासणी करा. उच्च कोलेस्टेरॉल, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक तुमच्या घरात कुणाला असेल तर वेळोवेळी तपासणी करा. तसेच हायपोथायरॉईडीझम आणि मधुमेहामुळे (Diabetes) कोलेस्टेरॉल वाढते.

2. जीवनशैलीत बदल

जर तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर जीवनशैलीत बदल करा. वजनावर नियंत्रण ठेवा. तुम्ही सॅच्युरेटेड फॅट, मिठाई, मीठ, प्रक्रिया केलेले अन्न, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा.

High Cholesterol, High Cholesterol Disease
Mouth Cancer : मौखिक कर्करोगाला प्रतिबंध कसे कराल? जाणून घ्या डॉक्टरांकडून

3. वजन नियंत्रणात ठेवा

शारीरिक क्रियाकलप केल्याने अनेक आजार दूर होतात. उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा. वजन कमी करुन संतुलित केल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

4. धुम्रपान आणि मद्यपान

उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णाने धुम्रपान करु नये. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. धमन्या कडक होतात. यामुळे रक्तामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com