Hair Growth : केस इतके लांबलचक होतील की, महिन्यातून २ वेळा करावा लागेल हेअर कट; घरीच बनवा रामबाण तेल

Hair Growth Oile : हेअर ऑइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे त्याने केसांची छान वाढ होते. केस गळणे बंद होते. शिवाय पांढरे केस पुन्हा काळे देखील होऊ शकतात.
Hair Growth Oile
Hair Growth Saam TV

केस गळणे, पांढरे होणे, केसांत कोंडा होणे या समस्यांचा प्रत्येक व्यक्ती सामना करत आहे. काही व्यक्तींना तर अगदी तरुण असताना देखील टक्कल पडतं. त्यामुळे व्यक्ती बाजारात मिळणारे विविध हेअर ऑइल वापरतात. मात्र याचा केसांसह स्किन आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज घरच्याघरी बनेल असं एक रामबाण हेअर ऑइल जाणून घेऊ.

Hair Growth Oile
Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

या हेअर ऑइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे त्याने केसांची छान वाढ होते. केस गळणे बंद होते. शिवाय पांढरे केस पुन्हा काळे देखील होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ तेल बनवण्यासाठीचं साहित्य आणि सामग्री.

साहित्य

१०० ग्राम कांदा

१ ते २ किलो तिळाचे तेल

१ ते २ कटोरी मेथीचे दाणे

१ ते २ कप कलौंजी

असं बनवा तिळाचं तेल

सर्वात आधी कांदा बारीक चिरून घ्या. किंवा किसनीवर मस्त किसून घ्या.

त्यानंतर एक कढई घ्या. त्यामध्ये तिळाचं तेल टाका.

तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा मिक्स करा.

त्यानंतर त्यामध्ये मेथीचे दाणे आणि कलौंजी देखील मिक्स करा.

हे तेल छान उकळून घ्या. तेल उकळल्यानंतर ते आधीपेक्षा थोडं कमी होईपर्यंत गरम करा.

त्यानंतर गॅस बंद करून तेल रुम टेंपरेचरवर येऊ द्या.

पुढे एका सुती कापडाने आणि गाळणीने संपूर्ण तेल गाळून घ्या.

तयार तेल एका काचेच्या डब्ब्यात भरून ठेवा.

या तेलाचे फायदे

तयार तेल तुम्ही दर दोन दिवसांनी केसांत अप्लाय करा. जास्तीत जास्त तेल लावल्यास त्याने तुम्हाला लवकर चांगला रिझल्ट मिळेल. हे तेल केसांना लावल्याने केस गळणे महिन्याभरात कमी होईल. शिवाय पांढरे केस देखील पांढरे होतील. यातील ओमेगा सारखं फॅटी अॅसिड तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत करते.

या गोष्टींची काळजी घ्या

शक्यतो हे तेल रात्री झोपताना लावा आणि सकाळी उठल्यावर धुवून टाका. केसांमध्ये आणि स्कॅल्पवर जास्तप्रमाणात तेल असेल तर त्याने कोंडा होण्याची शक्यता असते.

Hair Growth Oile
Almond Oil: रात्री नाभीवर बदामाचे तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com