ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयोग करतो.
पण अनेक मुलींच्या शरीरावर केस असल्यामुळे त्यांना कॉंफिडेंट वाटत नाही.
शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापर केला जातो.
पण त्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक समस्या होऊ शकतात.
हेअर रिमूव्हल क्रीमची पीएच जास्त असते, ज्यामुळे खाज पुरळ जळजळ यासारख्या समस्या होऊ शकतात.
या क्रिममुळे नको असलेले केस निघून जातात मात्र त्वचा काळपट पडू शकते.
हेअर रिमूव्हल क्रीम वापरण्या आधी पॅच टेस्ट करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.