जवळपास आपल्यापैंकी प्रत्येकजण कीबोर्ड हाताळतो मात्र तुम्ही कधी कीबोर्डवर असलेल्या अक्षराबद्दल विचार केला आहे का? कॉम्प्युटर आधुनिक काळातील आधुनिक यंत्र. कॉम्प्युटर या सगळ्या विश्वात सर्वाधिक वापरले जाणारे यंत्र अर्थात उपकरण आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक कॉम्प्युटर बनला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योग क्षेत्रात सर्वत्र संगणकाचा वापर करतात. याच कॉम्प्युटरच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्ती स्मार्ट बनला आहे. कॉम्प्युटरच्या वापराने अनेक कामे अगदी सहज आणि सोपी झाली आहेत. व्यक्तींची दररोजची काम या मार्फत केली जातात, जसे की कार्यालयीन काम असल्यास इमेल पाठवणे, महत्त्वाची कागदपत्रे पाठवणे शिवाय लहान मुलांसाठी गेम खेळणे इत्यादी.
कॉम्प्युटर फक्त एक वस्तू नाही तर संपूर्ण वस्तूंचा सग्रंह. कॉम्प्युटरवर (Computer) कोणतेही काम परीपूर्ण करण्यासाठी कॉम्प्युटरसोबत असलेल्या उपकरणांची मदतही घ्यावी लागते. जसे की किबोर्ड आणि माऊस शिवाय सीपीयू तसेच असे अनेक उपकरणं. मात्र कॉम्प्युटर हे उपकरण चालवण्यासाठी किंवा कॉम्प्युटरवर काहीही टाईप करण्यासाठी किबोर्डचा वापर अतिमहत्त्वाचा आहे. किबोर्ड हा संगणकाचा अविभाज्य भाग आहे. ज्याच्या शिवाय कोणतेही काम अपूर्ण. मात्र या किबोर्डबाबत तुम्हाला एक खास गोष्ट माहिती आहे का?
किबोर्ड हे एक उपकरण (device) येण्याआधी सर्वत्र टाइपरायटरचा वापर होत असे. मात्र टाइपरायटराच्या वापरानंतर किबोर्ड हे उपकरण बनवण्यास कल्पना सुचली. एका रिपोर्टनुसार १९७० च्या दशकात पहिल्या किबोर्डचा वापर करण्यात आला. आतापर्यंत आपण सर्व वापरत असलेल्या किबोर्डमध्ये अनेक बदल झालेले आहेत. कुठे किबोर्डचा आकार तर कुठे किबोर्डची रुंदी. बाजारात जर तुम्ही अनेक किबोर्ड पाहत असाल कुठे रंग (Color) वेगळा तर लाईटवाला किबोर्ड. मात्र किबोर्डमधल्या अक्षराविषयी तुम्हाला माहिती आहे का?चला तर आज जाणून घेऊयात या किबोर्डमध्ये असलेले इंग्रजी अक्षराविषयी.
जेव्हाही आपण किबोर्ड वापरत असतो तेव्हा एक प्रश्न (Question) तुम्हाला पडला असेल की, किबोर्डवर टायपिंगसाठी असलेली अक्षर ही अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार का नसतात. किबोर्ड असलेली अक्षरांच्या सुरुवात ''A''सुरुवात होते नंतर ''S'' हे अक्षर होते. या किबोर्डवर असलेल्या उलट्या अल्फबेटिकल ऑर्डरचा तुम्ही विचार केला आहे का? मात्र किबोर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या या उलट्या अल्फाबेटिकल ऑर्डरला ''QWERTYफॉरमॅट'' असे म्हटले जाते.
कीबोर्डमध्ये (Keyboard) वापरात असलेला फॉरमॅटहा आधिपासून नव्हता. ज्या वेळेस पहिला टाइपरायटर तयार केला तेव्हा ''ABCD'' या फॉरमेटमध्ये अक्षर होती. परंतू या सरळ (Straight) अक्षरांमुळे टायपराइटरच्या सुया एमेंकात अडकण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम टायपिंगचे काम हळुवार झाले. या सर्वांवर उपाय व्हावा यासाठी किबोर्डमध्ये सुधारणा करुन ''QWERTYफॉरमॅट'' वापरात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.