Jalna News : जालन्यातील दहिफळ खंदारेमध्ये आकाशातून कोरियन उपकरण पडलं; परिसरातील गावात एकच खळबळ

Jalna News in Marathi : जालना जिल्ह्यातील दहिफळ खंदारे गावात शनिवारी आकाशातून एक शास्त्रीय उपकरण कोसळल्याने एकच खबळ उडाली आहे. हे उपकरण हवेतून पडताना दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Jalna News
Jalna News Saam tv
Published On

Jalna Latest Update :

जालना जिल्ह्यातील दहिफळ खंदारे गावात शनिवारी आकाशातून एक शास्त्रीय उपकरण कोसळल्याने एकच खबळ उडाली आहे. हे उपकरण हवेतून पडताना दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

शनिवारी दहिफळ खंदारे गावात आकाशातून एक वस्तू कोसळताना ग्रामस्थांनी पडताना आढळून दिसून आली. त्यावेळी ग्रामस्थ भयभीत झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी याबाबत माहिती तात्काळ सरपंच आणि ग्रामसेवक तलाठी यांना दिली. माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी तात्काळ यांची माहिती मंठा तहसीलदार यांना देऊन सदरील यंत्राची तपासणी करण्यासाठी पाठवले आहे. त्यांनी या उपकरांची तपासणी केली आहे.

तसेच या उपकरणावर लिपीत काहीतरी लिहिलेले असल्याचे आढळून आले. या उपकरणाबाबत भाषा अभ्यासकांना विचारणा केल्यानंतर ही भाषा कोरियन असल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरियन शास्त्रीय उपकरण असल्याचे सिद्ध झाले.

Jalna News
Jalna Maratha Reservation Protest | मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन | Marathi News

या उपकरणावर असलेल्या कोरियन भाषेचा अनुवाद केल्यानंतर हे उपकरण कोरिया प्रजासत्ताकदिनाला सरकारद्वारे वापरले जाणारे उच्च उंचीचे हवामान निरीक्षण करणारे उपकरण आल्याचं समोर आलं. ते पुनर्जिवीत केले जाऊ शकत नाही. तसेच ते धोकादायकही नाही. त्यामुळे ते सामान्य कचरा म्हणून त्याची विल्हेवाट लावावी, असा मजकुर लिहिलेला आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा जिवात जीव आला.

Jalna News
Manoj Jarange Patil In Jalna | सगेसोगरेबाबत मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? | Marathi News

या उपकरणाचा पंचनामा करून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले आहे. हे उपकरण पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खबळ उडाली होती. त्यामुळे परिसरात आणि जिल्ह्यात चर्चाचा विषय बनला होता. मात्र हे उपकरण थेट कोरियाहून दहिफळ खंदारे या गावात कसे आले, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com