Mumbai News : बनावट आधारकार्ड रॅकेट उद्ध्वस्त, BMCची वेबसाईटही केली हॅक? दोघांना केली अटक

Mumbai News : मुंबई महापालिकेची वेबसाईट हॅक करून बोगस जन्मदाखले देखील तयार केले होते.
Borivali News
Borivali NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai News : आधार कार्डातील गोपनीय माहिती उपलब्ध होत असल्याची चर्चा सुरू असतानाच, अवघ्या दोन हजार रुपयांत अस्सल दिसणारे बनावट आधार कार्ड, हजार रुपयांत पॅन कार्ड तयार करणारी टोळी बोरिवली पोलिसांच्या एटीसी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. या टोळीने आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करण्यासाठी  मुंबई महापालिकेची वेबसाईट हॅक करून बोगस जन्मदाखले देखील तयार केले होते.

बोरिवलीत डॉक्युमेंटशेनच्या नावाखाली हे बेकायदा कृत्य सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. प्रमोद रामप्यारे शर्मा (44 वर्ष) व गुलजार बरकत अली खान, (48 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील गांजावाला अपार्टमेंट या ठिकाणी असलेल्या आधार कार्ड केंद्रावरती बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड तयार करुन दिली जात असल्याची माहिती बोरीवली पोलीस ठाणेचे पोउपनि प्रमोद निंबाळककर यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत मिळाली. (Crime NEws )

Borivali News
Misbehaving with Girl in Train: धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकावरील घटना

यानंतर बोरिवली पोलिसांनी खबरीची शहानिशा करुन त्या आधार कार्ड केंद्रावर छापा टाकला. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी मुंबई महानगरपालिकेची जन्म मृत्यूचे दाखले देणारी साईट क्लोन आणि हॅक करून अनेक जन्म दाखले काढून त्या आधारे पॅन कार्ड व आधार कार्ड हजार दोन हजार रुपयांमध्ये विक्री केल्याचे कबूल केले. (Latest Marathi News)

Borivali News
Mumbai Rains : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पुढील 3-4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात काय स्थिती?

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासन व नागरिकांची फसवणूक केली म्हणून या दोघांविरोधात बोरिवली पोलिसांनी कलम 420, 465,468,471,34 भादंवी नुसार गुन्हा दाखल करून प्रमोद रामप्यारे शर्मा (44 वर्ष) व गुलजार बरकत अली खान, (48 वर्ष) यांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून मोबाईल, मॉनिटर, किबोर्ड, सीपीयू, फिंगरस्कॅनर, आय स्कॅनर, कॅमेर, प्रिंटर व स्कॅनर आणि मुंबई महानगरपालिकेची बनावट जन्म प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com