how to identify adulterated food : मुलांच्या डब्यात असोत किंवा प्रवासातला टाईमपास... चिप्स खायला सगळ्यांनाच आवडतात... मात्र, तुम्ही खात असलेले चिप्स घाणेरडे तर नाहीयेत ना...हो... चला तर मग नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
मुलांच्या डब्यात असोत किंवा प्रवासातला टाईमपास... चिप्स कुणाला खायला आवडत नाहीत... मात्र, सावधान ! पुढच्या वेळी चिप्सचं पाकीट उघडण्यापूर्वी विचार करा...तुम्ही खात असलेले चिप्स आजाराला तर निमंत्रण देत नाहीयेत ना?.आम्ही असं का म्हणतोय ?त्यासाठी हा व्हिडीओ पाहा...
हा व्हिडिओ कुठल्या धोबीघाटावरचा नाहीये तर हा व्हिडीओ आहे चिप्स बनवणाऱ्या फॅक्टरीतला... हा तरुण थेट चिप्स बनवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या हौदातील गुडघ्याभर पाण्यात उतरून उघड्यानेच बटाट्याच्या स्लाईस धुतोय. हे पाणी सुध्दा गलिच्छ दिसतंय...
आता हा दुसरा व्हीडीओ पाहा..या व्हीडीओतही कशा प्रकारे घाणेरड्या जागेत हे चिप्स केले जाताहेत. ते दिसून येतंय.
एवढंच नाही तर या बटाटाच्या स्लाईस वारंवार गरम केलेल्या तेलात तळल्या जात आहेत. त्यामुळे हे चिप्स खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तर दुसरीकडे, चव वाढवण्यासाठी रसायनेदेखील वापरली जातात. अशा प्रकारचे चिप्स खाल्ल्यानं गंभीर आजार जडू शकतात असा इशारा डॉक्टरांनी दिलाय..
खरंतर, अनेकदा फक्त नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांना कोणाचंच भय उरलेलं नाही. अशातच आता स्वच्छतेचा फज्जा उडालेल्या फॅक्टरीत इतक्या निकृष्ट दर्जाचे चिप्स तयार करून ग्राहकांना खाऊ घातले जातायेत. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. राजरोसपणे चिप्स तयार करून बाजारात विकले जात असतील तर अन्न आणि औषध प्रशासन काय करतंय? प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का? असा सवाल उपस्थित होतोय.
ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.