Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला? महाराष्ट्रातील २ नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, नेमकी वेळही सांगितली

Eknath Shinde Operation Tiger : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा मुहूर्त निश्चित झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर, उद्धव ठाकरे मैदानात
Uddhav Thackeray vs Eknath Shindesaam tv
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार का? हे ऑपरेशन टायगर नेमके काय आहे, त्याचा कुणाला झटका बसणार, मुहूर्त नेमका कधी? अशा प्रश्नार्थक चर्चांची वावटळ राजकीय वर्तुळात उठली आहे. हे ऑपरेशन टायगर कधी करणार? त्याची योग्य वेळ कोणती याबाबतचे संकेत शिंदेंच्या दोन नेत्यांनी दिले आहेत.

ऑपरेशन टायगरच्या चर्चेला शिंदेसेनेचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळं हवा मिळाली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी ऑपरेशन पूर्ण होईल, असा दावा जाधव यांनी केला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रतापराव जाधवांच्या दाव्याला निलेश राणे यांनी दुजोरा देत अगदी तसंच होणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेत येण्यासाठी सर्वच उत्सुक

ऑपरेशन टायगरची चर्चा आणि त्यानंतर उद्या, रविवारी मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची होणारी बैठक याबाबत निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना, उद्धव ठाकरेंना खोचक टोलाही लगावला. ते नेहमीच बैठका घेत असतात. त्यांच्या बैठकांना किती आमदार-खासदार जातात, हे मोजून बघाच. आता विश्वासच राहिला नाही. ते नेहमी बैठक घेतात. १० दिवसांपूर्वी बैठक आयोजित केली होती, अनेक खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे ती बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, असं निलेश राणे म्हणाले.

ऑपरेशन टायगर काय एका महिन्यापासून सुरू आहे असा काही विषय नाही. आमच्याकडे कायम इनकमिंग असते. सर्वांनाच आमच्या पक्षात येण्यात रस आहे. शिंदे हे २४ तास उपलब्ध असतात. संघटनेचं पाठबळ मिळतं. कानाकोपऱ्यात शिवसेना पोहोचली आहे. अशा संघटनेत काम करण्याची सगळ्यांची इच्छा आहे. विरोधकांकडे तर काहीच नाही. रिकामी भांडी आहेत. देण्यासारखं आता काही नाही. संपर्क नाही. कधीतरी महिन्यातून बाहेर पडायचं याला काही पक्ष म्हणत नाहीत हे तिकडच्या लोकांच्या लक्षात आले आहे, असा खोचक टोलाही राणेंनी लगावला. प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या दाव्याबाबत विचारल्यानंतर एकदम बरोबर आहे असं सांगतानाच, तसेच होणार असल्याचं ठामपणे सांगितले.

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर, उद्धव ठाकरे मैदानात
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

ऑपरेशन टायगरच्या चर्चेला फोडणी

शिंदेसेनेचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चेला राजकीय फोडणी मिळाली. ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, ते पूर्णत्वाकडे जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन पूर्ण होईल, असे ते म्हणाले. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अप्रत्यक्षपणे याबाबत कबुली दिल्याचा दावा देखील जाधव यांनी केला.

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर, उद्धव ठाकरे मैदानात
सर्व 9 खासदार येणार की काही पाठ फिरवणार? राज्यात पुन्हा होणार ऑपरेशन टायगर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com